*मॅजिक बस संस्थेच्या वतीने चीचबोडी आणि बेलगावं येथे पालक सभा व शैक्षणिक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन
*मॅजिक बस संस्थेच्या वतीने चीचबोडी आणि बेलगावं येथे पालक सभा व शैक्षणिक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन*
दिनांक१३ ते १५ जून २०२३ या कालावधीत मौजा चीचबोडी व बेलगावं येथे मॅजिक बस संस्थेच्या वतीने पालक सभा व शैक्षणिक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पालक सभेच्या माध्यमातुन पालकांना शिक्षणाचे महत्त्व, स्त्री- पुरुष समानता ,आरोग्य आणि उच्च शिक्षणाचे महत्व इत्यादी विषयावर मॅजिक बस संस्थेचे शाळा सहाय्यक अधिकारी श्रद्धा नागमोते यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. मोठ्या उत्साहाने पालकांनी व गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी कार्यक्रमात व स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेत विजयी झालेल्या व सहभागी महिलांना घरकामात उपयुक्त पडणाऱ्या वस्तू मॅजिक बस संस्थेच्या वतीने बक्षीस म्हणून देण्यात आल्या.
सदर कार्यक्रम व स्पर्धा प्रशांत लोखंडे, वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस चंद्रपूर व तालुका समन्वयक आकाश गेडाम यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा सहाय्यक अधिकारी श्रध्दा नागमोते, निशा उमरगुंडावार व समुदाय समन्वयक सोनू कांबळे व शितल नस्कुलवार यांनी अथक परिश्रम घेतले.



