*नांदेड येथे झालेल्या हत्याकांडाचा सावली येथे निषेध
नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली या गावात प्रथमच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून 1 जून 2023 च्या सायंकाळी अक्षय श्रावण भालेराव या तरुणाची काही जातीद्वेषी तरुणांनी निर्घुण हत्या केली. यांचे निषेधार्थ हत्याकांडात समाविष्ट असणाऱ्या जातीयवादी समाजकंटकांना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी सावली येथे सर्व पक्षीय नेत्यांनी सावलीचे ठाणेदार यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन दिले.

अडीच ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या बोंढार हवेली या गावात 2016 मध्ये भीम जयंतीच्या कार्यक्रमावर हमला झाला होता. बौध्द समाजातील लोकांनी गावातील रस्त्यावरून कोणतीही मिरवणूक काढू नये अशी जातीयवादी भूमिका स्थानिक जातीयवादी समाजकंटकाने घेतली होती. यावर्षी मात्र दोन्ही बाजूच्या लोकांच्या पाच बैठका घेण्यात येऊन सामंजस्य घडविण्यात सामाजिक कार्यकर्ते फारूक अहमद यांनी पुढाकार घेऊन समेट घडवून आणला. त्यानंतर 29 एप्रिलला डॉ. आंबेडकर जयंती ची मिरवणूक शांततेत पार पडली. गावात प्रथमच बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक निघाल्याचा राग काही जातीयवादी समाजकंटकाच्या डोक्यात होता. त्याचा बदला म्हणून 1 जूनला अक्षय भालेराव या आंबेडकरी तरुणाची भर रस्त्यात बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ सावलीतील सर्वपक्षीय सुज्ञ नागरिकांनी निवेदन सादर केले. यावेळी रोशन बोरकर शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, विजय मुत्यालवार शहराध्यक्ष काँग्रेस, आशिष कार्लेकर शहर अध्यक्ष भाजपा, कैलास कापगते तालुका अध्यक्ष बाळासाहेबांची शिवसेना, अमर कोनपत्तीवार युवा अध्यक्ष काँग्रेस, ललिता मेश्राम शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, संदीप पुण्यपकार उपाध्यक्ष नगरपंचायत सावली, सतीश बोम्मावार विरोधी पक्ष गटनेता, प्रीतम गेडाम नगरसेवक, प्रफुल वाळके नगरसेवक, अंतबोध बोरकर नगरसेवक, गौरव संतोषवार, छत्रपती गेडाम, गुणवंत दुधे, संजय घडसे, निखिल दुधे, राहुल उंदीरवाडे, भुवनेश्वर बोरकर भावनाताई बोरकर, चंदाताई बांबोडे, शालू रामटेके, अरुणा सोमकुंवर, वर्षा मानकर, वृंदाबाई दुर्गे, विजय गायकवाड, आशिक गेडाम, नलिनी वासाटे, पुष्पा वनकर, गिरजाशंकर दुधे आदी नागरिक उपस्थित होते.



