Vidarbh24News

Latest Online Breaking News

बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक राज्यस्तरीय स्पर्धा

शासनाच्या स्पर्धेच्या पत्रकात सावली बसस्थानकाचे छायाचित्र

सावली: महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छ व सुंदर बसस्थानक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची पत्रके शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली असून, त्यात स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे छायाचित्र तसेच सावली स्थानकाचेही छायाचित्र टाकण्यात आलेले आहे. ही पत्रके संपूर्ण महाराष्ट्रभर वितरीत केली जात असून, यात सावली बसस्थानकाचे छायाचित्र असल्याने ही सावलीवासीयांसाठी गौरवाची बाब ठरली आहे.
राज्य परिवहन महामंडळाने नुकतीच
ही स्पर्धा जाहीर केली असून याअंतर्गत स्वच्छ व सुंदर स्थानकांना विभागानुसार पारितोषिके मिळणार आहेत. एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळाने राज्यातील ५८० एसटी बसस्थानके स्वच्छ, सुंदर बनविण्यासाठी स्वच्छता अभियानाची मोहीम हाती घेतली आहे. या अंतगत बसस्थानक स्वच्छ, सुंदर असेल, त्या बसस्थानकांना प्रदेश व विभागनिहाय बक्षिसे दिली जाणार आहेत. यामध्ये पहिला क्रमांक पटकावणाऱ्या बसस्थानकाला प्रदेश व विभागनिहाय ५० लाख, २५ लाख तर १० लाखांचे पक्षीस देऊन गौरवण्यात येईल. स्वच्छ सुंदर बसस्थानकांची स्पर्धा ही शहरी
आणि ग्रामीण भागात घेण्यात येणार आहे.
दर दोन महिन्याला परीक्षण करण्यात येणार आहे. त्यात बसस्थानक परिसर स्वच्छतागृह, प्रवासी बसची स्वच्छता, सुशोभीकरण, निटनेटकेपणा यावर आधारित गुण दिले जातील. त्याचबरोबर कर्मचान्यांची आरोग्य तपासणी, प्रवाशांसोबत सौजन्यशील वागणे, उत्पन्न वाढीसाठी केलेले प्रयत्न बसचे वेळापत्रक याचाही गुण देताना विचार केला जाणार आहे.
विभाग अ वर्ग, निमशहरी विभाग वर्ग, ग्रामीण विभाग क वर्ग या तीन विभागातील बसस्थानकांत घेण्यात येईल. ही स्पर्धा मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर, अमरावती अशा सहा प्रादेशिक विभागातही होणार आहे. यामध्ये शहरातील मुख्य बसस्थानक, तालुका बसस्थानक व ग्रामीण भागातील गावागावांतील बसस्थानकांची स्वच्छता सुशोभिकरण याचा समावेश असणार आहे. एसटी महामंडळाने राज्यातील सर्व ५८० बसस्थानके स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कर्मचारी तसेच एसटीचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता राज्यातील सर्व बसस्थानकांत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी लोकसहभागाचीही जोड देण्यात येणार आहे. सर्व बसस्थानकातील स्वच्छतेचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षण समिती नियुक्त केली आहे. त्या समितीमार्फत आभार मानले आहे.
शासनाच्या स्पर्धेच्या प्रचार यंत्रणेत सावली बसस्थानकाचे छायाचित्र टाकल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते. आमदार विजय वडेट्टीवार व माजी आमदार प्रा. अतुल देशकरांचे सावली येथील भाजपा नगरसेवक तथा गटनेता तथा महामंत्री सतीश बोम्मावार यांनी आभार मानले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!