*राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयातर्फे माती परीक्षण व शेतकरी मार्गदर्शन*
प्रतिनिधी:चंद्रशेखर प्यारमवार
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य,व विज्ञान महाविद्यालय सावली येथील ॲग्रो फोरम व कृषी विभाग सावली यांच्या संयुक्त विद्यमाने चकपिरंजी येथे माती परिक्षण व शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा दिनांक २९मार्च २०२३ला घेण्यात आली. चकपिरंजी येथील अनिलजी स्वामी यांच्या शेतात माती परीक्षण नमुने गोळा कसे करायचे व माती परीक्षणाचे फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेला कृषी सहाय्यक साखरे सावली, जोंधळे पाथरी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी प्रा. प्रशांत वासाडे ,डॉ. राजश्री मार्कंडेवार, डॉ. सचिन चौधरी, डॉ. रामचंद्र वासेकर उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांकडून माती परीक्षण नमुनेगोळा करण्यात आली या नमुन्याचे परीक्षण राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयातील ऍग्रो फोरमच्या वतीने करण्यात येऊन माती परीक्षणाचा रिपोर्ट शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानुसार शेतकऱ्यांना पीक आणि खताचे नियोजन करता येईल यावेळी चकपिरंजी परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.



