जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे चक्का जाम आंदोलन
लाडबोरी: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांनी संप पुकारल्याने शाळेतील विध्यार्थी मुलांचे नुकसान होत असल्याने , लाडबोरी मधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मधील वर्ग 1ते 7 मुलांनी आक्रमक पवित्रा घेत शिक्षकाच्या मागणी साठी सिंदेवाही ते चिमूर महामार्गांवर येऊन चक्का जाम आंदोलन केले , अगोदर च कोरोना मुळे या शालेय विध्यार्थी चे खूप नुकसान झाले आहे , आणी आत्ता शिक्षकांनी पुकारलेल्या संपा मुळे पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली आहे शाळेतील विध्यार्थी नी स्वतः रस्त्यावर येऊन बसले विध्यार्थी रस्त्यावर येताच गावातील नागरिकांनी विध्यार्थ्यांच्या आंदोलन ला पाठिंबा दिला, विध्यार्थी नी रस्त्यावर वाहतूक अडवून धरली ही बातमी वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली आणी या साठी या आंदोलनाची दखल सर्व प्रथम सिंदेवाही पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सन्मा. तुषार चव्हाण यांनी घटना स्थळी भेट दिली , व विध्यार्थी च्या व्यथा जाणून घेतल्या , या वर तोडगा काढण्यासाठी विध्यार्थना समाजवून व घटना स्थळावर गट विकास अधिकारी सिंदेवाही अक्षय सुक्रे यांना बोलाविण्यात आले, यानंतर पोलिसच्या मध्यस्तीने गावातील ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांचं शिष्ट मंडळ पंचायात समिती कार्यालय मध्ये यावर तोडगा काढण्यासाठी बोलाविले , व यामध्ये उद्या जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थी ना शिकविण्यासाठी दोन शिक्षक उपलब्ध करून देण्याचे तोंडी आश्वासन दिले, तूर्तास जर उद्या शाळेत शिक्षक हजर झाले नाही तर उद्या पुन्हा विध्यार्थी चक्का जाम करण्याचा इशारा विध्यार्थी सोबत पालक वर्गणी दिला आहे



