संस्कृत बोलणारा वाहन चालक रशिद झाला वकील.*
*संस्कृत बोलणारा वाहन चालक रशिद झाला वकील.*
चंद्रपूर येथील प्रथितयश वकील रवींद्र भागवत, श्री मोहनजी भागवत यांचे बंधू, यांच्याकडे वाहनचालक म्हणून गेली १४ वर्ष काम करणारा रशिद याकुब शेख हा तरुण एव्हाना वकील झाला आहे.
रशिद अगदी अस्खलितपणे संस्कृत बोलतो, *वाहनचालकाचा वकील होण्यापर्यंतचा प्रवास आज नव्याने अधोरेखित झाला असून, तो अगदी थक्क करणारा आहे. परिसस्पर्श झाला की काय घडू शकते, याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. शिवाय, असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करणार्यांना चपराक बसेल, अशी ही सहज घडलेली गोष्ट आहे.*
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चंद्रपूरचे तत्कालीन विभाग प्रचारक योगेश बापट यांनी रशिदला ऍड्. रवींद्र भागवतांकडे कामासाठी पाठवले होते. तेव्हा तो दहावी नापास होता. वाहन चालवणे त्याला येत होते. त्यामुळे वाहनचालक म्हणून त्याला कामावर घेण्यात आले. भागवत कुटुंबातील प्रेमाचे अन् जिव्हाळ्याचे वातावरण बघून रशिद अल्पावधितच या परिवाराशी एकरूप झाला. आपुलकीची माणसं कशी असतात, याचा प्रत्यय त्याला आला आणि तेव्हापासून आज जवळजवळ एक तप लोटले, तरी भागवत कुटुंबापासून वेगळे होण्याचा विचारही रशिदच्या मनाला शिवलेला नाही. किंबहुना, आता रशिद वकील झाला असला तरीही भागवतांची गाडी चालवण्याचा त्याचा आग्रह कायमच होता. पण रवींद्र भागवतांनीच आता त्याला त्यांची गाडी चालवण्यापासून रोखले आणि आपल्या मार्गदर्शनात त्यास ते वकिलीच्या व्यवसायाचे धडे देत आहेत. रशिदने प्रॅक्टिसही सुरू केली आहे.
रशिदने रवींद्र भागवतांकडेे केवळ वकिलीचे शिक्षणच घेतले नाही, तर तो जगण्याचे उच्च संस्कारही या परिवाराकडून शिकला. दरम्यान, असेच एकदा रवींद्र भागवतांकडे आलेले संस्कृत भारतीचे प्रांत संघटनमंत्री सचिन कठाळे यांच्याशी रशिदची भेट झाली. कठाळे यांच्याशी बोलून तो कमालीचा प्रभावित झाला आणि एक महिन्याच्या संस्कृत संभाषणाच्या वर्गाला गेला. संस्कृत शिकण्याची साधना करून, शक्य होईल त्यांच्याशी रशिद संस्कृतमध्ये बोलू लागला. न्यायालयाच्या कामानिमित्त अधूनमधून येणारे एकनाथराव सराफ यांच्याशी तो संस्कृतमध्येच गप्पा करीत असे. त्यांच्या गप्पा परिसरातील सारेच मोठ्या कौतुकाने ऐकत.
रशिदचे कुटुंब तसे मोठे आहे. वडील ‘डिझेल मॅकेनिक’ असल्याने त्यांना तो मदत करायचा. हौस म्हणून चारचाकी वाहन शिकला. पुढे त्याची नाविन्याची ओढच त्याच्या वकिलीपर्यंतच्या प्रवासासाठी कारणीभूत ठरली. भागवत कुटुंबाचा मायेचा ओलावा रशिदसाठी लाख मोलाचा ठरला. या कुुंटुंबातील चार पिढ्यांच्या वकिली व्यवसायात जी माणसे घडली, त्यात रशिद एक होता. या कुटुंबाच्या संपर्कात येऊन रशिद तर धन्य झालाच, पण भागवत कुटुंबालाही रशिदला वकील होत असल्याचे पाहून अभिमान वाटला असेल, यात शंका नाही.
संस्कृतेन चिन्तनं मानसोल्लासनम्
संस्कृतेन लेखनं सर्वकार्यसाधनम्
संस्कृतेन भाषणं भारतवर्षभूषणम्…
अशी महती असलेल्या संस्कृत भाषेचे ज्ञान घेऊन रशिद उल्हासित आहे. खरे तर, मुस्लिम समाजाची व्यक्ती शुद्ध मराठी जरी बोलताना दिसली, की आपल्याला आश्चर्य वाटते. तेथे रशिद अस्खलितपणे संस्कृत बोलतो. तेवढेच प्रभुत्व ठेवून तो ही भाषा लिहितो आणि जगतोसुद्धा. दैनंदिन जीवनात घरी साधे साबणही मागायचे असले, तरी तो आई जमिला बेग हिच्यासोबत संस्कृतमध्येच संभाषण करतो. २००४ मध्ये दिल्ली येथील संवाद शाळेत रशिदने १५ दिवसाचे प्रशिक्षण घेतले. बोलल्याशिवाय कुठलीही भाषा येत नाही, हे समीकरण समोर ठेवून तो बोलत राहिला.
‘‘आमच्यासाठी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी गप्पा करणे म्हणजे अगदी सहज गोष्ट’’, असे अभिमानाने सांगणारा रशिद त्यांच्यासोबतची एक आठवण आवर्जून सांगतो. मोहनजी एकदा दिवाळीत घरी आले होते. लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. रवींद्र भागवतांची पुस्तकांवर शुभ-लाभ लिहिण्याची लगबग सुरू होती. तेवढ्यात मोहनजी उद्गारले, ‘‘अरे, हा रशिद आहे ना, त्याला सांगा. संस्कृतचा पंडित आहे तो.’’….. तर, असा हा रशिद.
चालक रशिद झाला वकील.*