जागतिक महिला दिनाच्या औचित्याने विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ महिला मंडळ,जिल्हा.प.प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत हिरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने *एक दिवस महिलेचा, तिच्या हक्काचा … तिच्या सन्मानाचा* या अभियाना अंतर्गत सावली तालुक तालुकास्तरीय विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रांगोळी स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, चमच गोळी स्पर्धा, संगित खुर्ची, पोत्यात पाय टाकून चालणे, एक मिनिट शो, क्रीडा स्पर्धा, एकलनृत्य स्पर्धा,समूहनृत्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात संपन्न झाले.

वरील सर्व कार्यक्रम हे जिल्हा परिषद शाळा , हिरापूर येथील पटांगनावर पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटक लताताई लाकडे नगराध्यक्ष नगर पंचायत सावली, अध्यक्ष उषाताई भोयर महिला काँग्रेस कमिटी सावली, प्रमूख पाहुणे सूनिताताई उरकुडे, सरपंच ग्रामपंचायत व्याहाड खुर्द, प्रितीताई गोहणे सरपंच हिरापुर उपस्थित होते.
संचालक इंदुरकर मॅडम तर आभार प्रदर्शन किशोर लाडे यांनी केले.



