*विश्वशांती विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा*
प्रतिनिधी:
भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार हे होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून वनिता गेडाम यांनी शहरातील मुली शिक्षणात किंवा अन्य क्षेत्रात जेवढ्या पुढारलेले आहेत. तेवढेच ग्रामीण भागातील मुली मागासलेले आहेत. महिलांनी केलेल्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक कामगिरीची दखल घेण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो, असे मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक अरुण राऊत, उर्मिला बारेकर, रिंकी कोतपल्लिवार, श्वेता खर्चे, राजश्री बिडवई, के. प्रसन्नाराणी आदी शिक्षक मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन सुमित्रा प्रधाने यांनी केले तर आभार दुर्गा देवतळे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.



