विज्ञान मेळाव्याचे आयोजन
विज्ञान मेळाव्याचे आयोजन …..
* राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य *
* उच्च प्राथमिक शाळा लोंढ़ोलीचा उपक्रम *
सावली ( लोकमत दुधे ) तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोंढ़ोलीच्या वतिने नुकताच शालेय स्तरीय अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करन्यात आले या कार्यक्रमाचे उदघाटक उष्टूजी पेंदोर सरपंच, संजय दुधबळे, शाळा समिती अध्यक्ष व मार्गदर्शक म्हणून माधुरीताई घोंगडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रतिकृती तयार केल्यात. तसेच प्रश्नमंजुषा व सामान्य ज्ञान स्पर्धा सुद्धा घेण्यात आली .वैज्ञानिक प्रतिकृतीमध्ये प्रथम क्रमांक वेद रंजीत भुरसे वर्ग ६ वा द्वितीय क्रमांक स्वरूप एकनाथ चिचघरे व तृतीय क्रमांक आर्यन खेमाजी सातपुते वर्ग ७ वा यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमास सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे सरपंच उष्टुजी पेंदोर यांनी कौतुक केले.पुढे वैज्ञानिक बनवून गावाचे नाव मोठे करावे अशा आशा व्यक्त करुन आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे संजयजी दुधबळे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन एमपीएससी व यूपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये याचा कसा फायदा होतो हे समजून सांगितले .याप्रसंगी माधुरीताई घोंगडे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार मूलकलवार यांनी केलेत. याप्रसंगी चुनारकर विज्ञान शिक्षक अविनाश घोनमोडे ,भोयर ,जाधव हे उपस्थित होते ….



