Vidarbh24News

Latest Online Breaking News

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या जिल्हा अधिवेशनाचे आयोजन

*महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या जिल्हा अधिवेशनाचे आयोजन

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा शाखा चंद्रपूरचे जिल्हा अधिवेशन दि. 26 फेब्रुवारी 2023 ला माँ तुलसी लॉन, सिंदेवाही येथे संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण गाडे, केंद्रीय अध्यक्ष, म. रा. कास्ट्राईब कल्याण महासंघ पुणे, उदघाटक विजयभाऊ वडेट्टीवार, माजी कॅबेनेट मंत्री तथा विद्यमान आमदार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र, स्वागताध्यक्ष अरुण खराते जिल्हा अध्यक्ष कास्ट्राईब संघटना चंद्रपूर हे राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून श्याम तागडे, आय. ए. एस. से. नि. अति. मुख्य सचिव गृह विभाग म. रा., मा. सिद्धार्थ गायकवाड, उपायुक्त, सामाजिक न्याय विभाग, नागपूर, विवेक जान्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर, श्याम वाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. चंद्रपूर, दिपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी जि. प. चंद्रपूर, प्रियंका रायपुरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी जि. प. चंद्रपूर, धर्मराव पेंदाम, उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी जि. प. चंद्रपूर, अक्षय शुक्रे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिंदेवाही, किशोर पिसे, गटशिक्षणाधिकारी, पं. स. सिंदेवाही, नरेन गेडाम, सामाजिक विचारवंत, चंद्रपूर, गौतम मेश्राम, गटशिक्षणाधिकारी पं.स. मुलचेरा इ. पाहुणे उपस्थित राहणार आहेत.


प्रथम सत्रात स्मरणीकेचे प्रकाशन सर्व प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत होईल. द्वितीय सत्रात “वर्तमान स्थिती, कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या व संघटनेची भूमिका” यावर. नरेन गेडाम विचार मांडतील. तर तिसऱ्या सत्रामध्ये विविध विषय व ठराव घेण्यात येतील.
तरी कास्ट्राईब संघटनेच्या जिल्हा अधिवेशनास बहुसंख्य शिक्षक, कर्मचारी आणि सामाजिक जाणीव असणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन म. रा. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ तालुका सावलीचे अध्यक्ष संदेश मानकर यांनी केले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!