विदर्भ निर्माण यात्रा सावली शहरात दाखल
विदर्भाच्या विकासासाठी, नक्षल वाद्यांना आळा घालण्यासाठी, प्रदुर्षण कुपोषण व बेरोजगारीला आळा घालण्यासाठी, विदर्भ मिशन 2023 अंतर्गत विदर्भ निर्माण यात्रा सिरोंचा तालुक्यातील कालेश्वर ते नागपूर असा प्रवास करणार आहेत. ही विदर्भ निर्माण यात्रा आज सावली शहरांत पोहोचली. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे अशा घोषणा देत सावली तालुक्यातील विदर्भवादी नेत्यांनी विदर्भ निर्माण यात्रेचे स्वागत केले. केंद्र सरकारने विदर्भ राज्य निर्माण करावे, विजेची दरवाढ राज्य सरकारने मागे घ्यावी, शेती पंपाला दिवसा विद्युत पुरवठा करावा, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नको स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, अन्न धान्यावरील जी एस टी रद्द करण्यात यावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या.
विदर्भवादी नेत्यांनी सावली शहरांतील डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यांना मालारपण केले त्यानंतर पत्रकार भवनात सभा घेण्यात आली.
यावेळी माजी राज्यमंत्री रमेश गजबे, अरुण केदार, तालुका अध्यक्ष गोपाल रायपुरे, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर गेडाम मंचावर उपस्थित होते. सूत्रसंचालन उदय गडकरी यांनी केले तर आभार प्रदर्शन बाबा मेश्राम यांनी केले यावेळी बहुसंख्य विदर्भवादी उपस्थित होते.



