नगरपंचायत सिंदेवाही-लोंनवाही सभापती-उप”सभापती पदांची बिनविरोध निवड..!
आज दिनांक 22/02/2023 रोज बुधवारला पीठासीन अधिकारी श्री गणेशजी जगदाळे “विद्यमान कार्यकारी दंडाधिकारी” सिंदेवाही यांचे निवडणूक निर्णय अधिकार क्षेत्रात तसेच श्री कंकाळ साहेब मुख्यधीकारी न.प. सिंदेवाही-लोंनवाही यांचे प्रमुख उपस्थीतीत न.प. सिंदेवाही-लोंनवाही येथील विविध विषय समित्यांच्या सभापती पदावर खालील प्रमाणे नामनिर्देशीत सदस्यांची “बिनविरोध” निवड करण्यात आलेली असून नगरपंचायत सिंदेवाही-लोंनवाही चे पदभार खालीलप्रमाणेआहेत.
स्थायी समीती विभाग :- स्वप्निल योगराज कावळे सभापती, श्री भास्कर श्रावण नन्नावार, पंकज प्रभुदास नन्नेवार, मयूर रमेशभाई सूचक, श्रीमती मीनाक्षी संजय मेश्राम
“सार्वजनिक बांधकाम व नियोजन” समीती सभापती :- श्री पंकज प्रभुदास नन्नेवार
“पाणीपुरवठा व जलनिस्सारन” समीती सभापती :- श्री भास्कर श्रावण नन्नावार
“स्वच्छता आरोग्य व वैद्यक” समीती सभापती :- श्री मयूर रमेशभाई सूचक
“महिला व बालकल्याण समीती सभापती :- श्रीमती मीनाक्षी संजय मेश्राम
महिला व बालकल्याण समीती उप-सभापती :- सौ पूजा विलास रामटेके
या प्रमाणे सर्व विषय समीती सभापतिंची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे, या करिता सर्व विभागाचे माजी सभापती तथा सर्व विद्द्यमान सन्मानिय पदाधिकारी, सदस्य हजर होते, यावेळी सर्व सन्माननीय सभापती महोदयांचा पीठासीन अधिकारी सह नगराध्यक्ष आणि मुख्यधिकारी यांच्या हस्ते सर्व विषय समित्यांच्या नवनियुक्त सभापती-उपसभापती यांना शुभेच्छा देण्यात आले
यावेळी प्रामुख्याने श्री सुनिलभाऊ उट्टलवार ज्येष्ठ नगरसेवक, शामभाऊ छत्रवानी नगरसेवक, दिलीपभाऊ रामटेके नगरसेवक, युनुसभाई शेख़ नगरसेवक, अमृत मडावी नगरसेवक, किशोर भरडकर नगरसेवक, सौ श्वेता मोहुर्ले नगरसेविका, सौ वैशालिताई पुपरेड्डीवार नगरसेविका, सौ निताताई रणदिवे नगरसेविका, सौ अंजुताई भैसारे नगरसेविका, सौ अस्मीता जुमनाके नगरसेविका, अपूर्वा चिंतलवार नगरसेविका, सौ दीपा पुसतोड़े नगरसेविका, यांची प्रामुख्याने उपस्थीती होती सर्वाणि नवनिर्वाचीत सभापती-उपसभापती यांचे शुभेच्छात्मक अभिनंदन केले
*सदर विषय समीती सभापती निवडणुकीत श्री पंकजजी आसेकर, श्री सुधीरजी ठाकरे, श्री आनंद मारबते, संजयजी बोंडगुलवार, कंबलवार इत्यादि अधिकारी सह कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



