भुसावळ येथील खडका येथे होमगार्डला मारहाण केल्याने चौघांविरूध्द गुन्हा दाखल,
भुसावळ येथील खडका येथे होमगार्डला मारहाण केल्याने चौघांविरूध्द गुन्हा दाखल,
मास्क लावण्याचे सांगितल्याचा राग आल्याने चौघांनी संगनमताने शिवीगाळ करुण, मारहाण केली.
विदर्भ 24 न्यूज़
जिल्हा प्रतिनिधी
भुसावळ :- तालुक्यातील खडका येथे कोरोना कोव्हीड-१ ९ प्रतिबंधित क्षेत्राच्या बॅरीकेट्स जवळ सेवा बजावत असलेल्या होमगार्ड सैनिकाला शिवीगाळ करुन,मारहाण, केल्याची घटना दि .१३ जुन शनिवार रोजी सकाळी १० वाजेदरम्यान घडली.या प्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. खडका येथील रहिवाशी व होमगार्ड दारासिंग नारायणसिंग पाटील ( वय ३८ ) रा.महाजन वाडा, खडका हे त्यांच्या घराजवळ कोव्हिड १ ९ प्रतिबंधित क्षेत्राच्या बॅरीकेट्स जवळ तैनात असतांना निलेश सुखदेव कोळी,अक्षय विश्वास पाटील,रोहन सुभाष कोळी व नथ्थु किसन कोळी, हे तेथे मास्क न लावता उभे असल्याने होमगार्ड दारासिंग पाटील यांनी त्यांना हटकून मास्क लावण्याचे सांगितल्याचा राग आल्याने चौघांनी संगनमताने शिवीगाळ , मारहाण,जिवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांचा शासकिय गणवेश फाडला. या प्रकरणी जखमी होमगार्ड दारासिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द मारहाण, शासकीय कामात अडथळ्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि.अमोल पवार हे करीत आहे .



