*विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीद्वारा संचालित विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे वर्ग ११ वीच्या विद्यार्थ्यांकडून वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. *मैदानाची माती पायाला कधी चिपकणार नाही, लहान मुलांचा किलबिलाट कधी ऐकू येणार नाही, विद्यालयाच्या नळाचा पाणी आपल्या नाजूक ओठांनी कधी पिपून घेता येणार नाही, जीवन कसे असते आणि कसे जगायचे असते ज्याचा त्याने ठरवायचे असते* असे मार्गदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.राऊत यांनी अध्यक्षस्थानावरून केले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांनी परीक्षा पद्धती आणि उत्तरपत्रिकेबद्दल उचित मार्गदर्शन केले. तसेच प्रा.सुपले प्रा.केदार यांचेही मार्गदर्शन लाभले. तसेच वर्ग ११वीआणि १२ च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा भाऊक होऊन मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रा.प्यारमवार यांच्या *मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा* या गीताने करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञा भोयर, कार्यक्रमाच्या संचालन प्रणय मडावी आणि श्रुती सातपुते तर आभार योगेश राजूरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.राजू झोडे, प्रा.प्रकाश गेडाम, प्रा.बिडवई, प्रा.आदे प्रा.आभारे प्रा. पुल्लावार,प्रा.देवतळे, तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.



