तालुक्यात मुरुम, माती उत्खननाला उधाण*
*तालुक्यात मुरुम, माती उत्खननाला उधाण*
“रस्ते नालीच्या कामासाठी मुरुम मातीचे ढिगारे”
“संबंधित विभागाचे दुर्लक्ष”
+पांदण रस्ते लालही लाल+
*सावली*– तालुक्यात चोरट्या मार्गाने रेतीसह मुरुम माती उत्खनाला उधाण आले असुन अशा गंभीर बाबींकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसते, आजच्या घडीला तालुक्यातील.अनेक ग्रामीण भागात रस्ते,नालीच्या कामात सुरुवात झाली आहे, त्यामुळे रस्त्याचे साईड बंब किंवा रस्त्याचे खडीकरण आदी कामासाठी मुरुमाची अत्यंत. आवश्यकता आहे, अशा कामाची सुर्वण संधी पाहुन काही कंत्राटदाराच्या माध्यमातून सर्रासपणे मुरुम माती आणि रेतीची चोरी होण्याच्या प्रकाराला उधाण येत.आहे त्यामुळे तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात सुरु असलेल्या नाली आणि रस्त्याच्या कामात शेकडो ब्रास रेती आणि मुरुमाचे ढिगारे पहावयास मिळत आहे,ऐवढेच नाही तर.रस्त्याच्या साईट बंब कामासाठी मुरुमा ऐवजी मातीचा सर्रासपणे वापर.केला जात आहे,
घाटाचे लिलाव नाही ,ब्रदी,मुरुम, नाली ला परवाना नसताना. मग कामानिमित्य शेकडो ब्रास पडलेले साहीत्य नेमके कुठून, कसा यक्ष प्रश्न निर्माण केल्या जात आहे, त्यामुळे शासनाचा लाखो रुपये व्यर्थ.जात असल्याचे एकंदरीत.पडलेल्या ढिगा-यावरुन दिसुन येत आहे ,मात्र अशा गंभीर बाबींकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसते, पावसाळ्याचे दिवस संपल्यानंतर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बांधकामाला सुरुवात होते, विशेष म्हणजे शासनाच्या अनेक जनकल्याण कारी योजनेंतर्गत नाल्या रस्ते आदीचे काम केले जाते, त्यासाठी रेती ,ब्रदी मुरुम ,माती आदी गौणखनिज साहीत्याचा वापर केल्या जातो , मात्र.या सर्व गौणखनिज साहीत्याची परवानगी नसताना ,किंवा रेती घाटाचे लिलाव नसताना अशा गौण खनिज साहित्याचे ढिगारे कामाच्या ठिकाणी कसे, त्याही पलीकडे शंभराची लिज घेऊन हजारो ब्रासचे उत्खनन चोरट्या मार्गाने करण्याचा सपाटा होत असल्याचे बोलले.जात आहे, त्यामुळेच कामाच्या ठिकाणी बेपरवाना मुरुम ,माती, रेती बद्रीचे ढिगारे निर्माण होत आहेत की काय याबाबत शंका व्यक्त केली जात.आहे,
तालुक्यातील.बोथली,हेटी,बोथली-केशरवाही मार्ग,सावली -जिबगाव, पारडी ते शेतशिवारातील पांदण रस्ता, असे तालुक्यातील अनेक मार्गाचे काम,खडीकरण, नाल्या आदी कामाचा सपाटा सुरु झाला असुन मोठ्या प्रमाणात गौणखनिज साहीत्याचा वापर केला जात आहे ,याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा महसूल बुडविल्या जात आहे, विशेष म्हणजे.शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्माण करण्यात आलेले पांदण रस्ते चोरट्या मुरुमामुळे लाल ही लाल होताना दिसत आहेत,गौण खनिज साहित्याच्या अशा चोरट्या कामाकडे लक्ष केंद्रित करून संबंधितावर कारवाई करुन शासनाची होणारी नुकसान थांबवावी अशी.मागणी जोर.धरत.आहे…



