बांधकाम कामगारांना पेटी वाटप योजना सुरू
:आपल्या महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र राज्याच्या इमारत व इतर बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ देण्यात येत असतो. ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली आहे अशा बांधकाम कामगारांना सध्या कामगार पेट्या यांचे वाटप करण्यात येत आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण बांधकाम कामगार सुरक्षा किट कशा मिळवायच्या या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र राज्याच्या इमारत व इतर बांधकाम कामगार विभाग मार्फत विविध प्रकारच्या 32 योजनांचा लाभ देण्यात येत असतो. यापैकी बांधकाम कामगारांकरिता असणारी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे सुरक्षा संचाचे वाटप करणारी योजना. या अंतर्गत नोंदणी केलेल्या असलेल्या बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार सुरक्षा संच म्हणजेच बांधकाम कामगार पेट्या वितरित करण्यात येत असतात.
मित्रांनो बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत वितरित करण्यात येणारे सुरक्षा संच हे केवळ नोंदणीकृत असणाऱ्या बांधकाम कामगार यांनाच वितरित करण्यात येत असतात. याकरिता तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम विभाग यांच्याकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार बनण्यासाठी अर्ज करावा लागेल. तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मिळण्यास पात्र असाल.
मित्रांनो बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सेफ्टी किट म्हणजेच पेट्या मध्ये खालील प्रकारच्या वस्तू असतात.
1. बॅग
2. बांधकाम करण्यासाठी लागणारे जॅकेट
3. हेल्मेट
4. स्टेनलेस स्टीलचा टिफिन चा डब्बा
5. टॉर्च
6. सेफ्टी बूट
7. पाणी पिण्यासाठी बॉटल
8. चटई
9. मच्छरदाणी ची जाळी
10. सेफ्टी बेल्ट
11. हॅन्ड ग्लोज



