*सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरूडवार यांच्या प्रयत्नाला यश आठ महिन्यानंतर कामाला झाली सुरुवात*
सावली तालुक्यातील ग्रामपंचायत चकपिरंजी वार्डनंबर-2 हनुमान मंदिराजवळील पुला वरील सिमेंट पाटी मागील आठ महिन्यापासून फुटलेली होती गावातील मुख्य रस्त्यावर दळणवळण करतांना खूप त्रास सहन कराव लागत होत हि समस्या लक्षात घेऊन सामाजिक युवा कार्यकर्ते प्रफुल निरूडवार यांनी पुढाकार घेऊन ग्रामसभेत हि समस्या मांडून तीथे मजबूत पुल तयार करण्यात याव आणि कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्यात याव अशी मांगणी केली होती.

सामाजिक कार्यकर्त प्रफुल निरुडवार यांच्या प्रयत्नामुळे अखेर कामाला सुरुवात झालेली आहे.त्यामुळे गावात नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदमय वातावरण झालेला आहे व गावातील नागरिकांन कडून ग्रामपंचायत चकपिरंजी पदाधिकारी यांचे अभिनंदन केले जात आहे.



