74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जि. प. प्रा. शाळा भिमणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जि. प. प्रा. शाळा भिमणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
पोंभूर्णा तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा भिमणी येथे 74 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ता. 31 जानेवारी रोजी विविध कार्यक्रम तसेच शालेय मला मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
पहिल्या सत्रात दू. 2-00 वा. ग्रां. पं. भिमणी च्या वतीने खास महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला व गावातील महिलांना वान देण्यात आले.या प्रसंगी उद्घाटक म्हणून कू. अल्काताई आत्राम व विशेष अतिथी म्हणून पल्लवीताई चाहाकाटे सरपंच ग्रा. पं. भिमणी , सुलभाताई पिपरे नगराध्यक्ष पोंभूर्णा, सुनिता म्याकलवार, माधुरी मोरे, रजिया कुरेशी, आकाशी गेडाम, श्वेता वनकर, नंदाताई कोटरंगे, रुपाली ढोले, पापिताताई तोडसाम, उपस्थित होत्या.याप्रसंगी कू. अल्काताई आत्राम यांनी महिलांनी चूल आणि मूल यामध्ये बंधिस्त न राहता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण कराव्यात व समाजात आपली प्रतिष्ठा वाढवावी असा सल्ला महिलांना दिला, यावेळी त्यांनी माता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनमानावर प्रकाश टाकत स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून दिले.,त्यानंतर महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, चमचा गोळी, संगीत खुर्ची, व महिला व पुरुषांचे कबड्डी सामने घेण्यात आले.

दुसऱ्या सत्रात रात्री 8-०० वा.शालेय मुलामुलींचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून कू. अल्काताई आत्राम माजी सभापती पं. स. पो़भूर्णा, अध्यक्ष म्हणून श्री. विनोदभाऊ देशमुख माजी उपसभापती पं. स. पोंभूर्णा हे उपस्थित होते. दीपप्रज्वलन सौ. पल्लवीताई चाहाकाटे सरपंचा ग्रा.पं.भिमणी, सौ.सुलभाताई पिपरे नगराध्यक्ष पोंभूर्णा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर श्री. रणजीत पिंपळशेंडे उपसरपंच ग्रा. पं. भिमणी श्री. संतोष दुधकोहर शा. व्य. समिती भिमणी, डॉ. नितेश पावडे उपसरपंच चेकठानेवासना, हरिभाऊ ढवस माजी सरपंच चेक आष्टा, भिमणी ग्रा.पं. चे सर्व सदस्य, शालेय व्य. समिती चे सर्व सदस्य, तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष तथा सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली व माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचा विशेष योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कु. गेडेकर मॅडम तर प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. दहीवले सरांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. शेडमाके सर व कु. रामटेके मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमात गावकऱ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.



