नगर पंचायतच्या क्रिकेट चषक़ात प्रभाग क्र १४ ची बाजी
नगर पंचायतच्या क्रिकेट चषक़ात प्रभाग क्र १४ ची बाजी ……
* प्रभातील १८ चमुचा समावेश *
* न प प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम *
सावली ( लोकमत दुधे )
नुकत्याच सम्प्पन्न झालेल्या नगर पंचायत चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेत प्रभाग क्र . १४ ने बाजी मारली असून विजेत्या संघाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी सावली चे ठानेदार आशिष बोरकर सह नगर पंचायत प्रशासनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कोरोनाच्या सिथिलतेमुळे आजच्या घडिला जनजीवन पूर्ववत झाल्यानतर अनेक कार्यक्रमाला सुरुवात झाली नुकताच ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला नगरपंच्यायत सावलीच्या वतिने प्रजासत्ताक दिनाचे ओचित्य साधुन नगरातील जनतेत ऐक्याची भावना निर्माण व्हावी म्हणून नगर पंचायत प्रशासनाने क्रिकेट चषक २०२३ चे आयोजन केले होते. प्रजासत्ताक दिनानिमित्य नगर पंचायत प्रशासना मार्फत नव्या वर्षात एखादा नवा उपक्रम व्हावा अशी कल्पना सर्व नगरसेवकानी व्यक्त केली आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन नगर पच्यायत प्रशासनाने क्रिकेट चषक २०२३ चे आयोजन केले सदर चषकासाठी प्रभागतिल १८ संघानी भाग घेतला असून चषकासाठी प्रथम पारितोषिक ११,१११ रु नगराध्यक्ष लता लाकडे तथा उप नगराध्यक्ष संदिप पुण्यपवार, द्वितीय पारितोषिक ७,७७७ नगरसेवक विजय मुत्यालवार तथा नगरसेवक सचिन सगिड़वार तर
तृतीय पारितोषिक ५,५५५ रुपये नगरसेवक सतीश बोम्मावार ,तथा निलम सुरमवार याचे कडून देण्यात येणार आले.

नगर पंचायत प्रशासनाकडुन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरनात सम्पन्न झालेल्या या चषकात नगर पंचायत प्रशासनाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन केले जात आसुन या क़ामात सारे नगर पंचायत प्रशासन कामाला लागले होते नुकात्याच सम्पन्न झालेल्या प्रभाग क्र ६ आणि प्रभाग क्र १४ च्या अंतिम मुक़ाबल्यात प्रभाग क्र १४ ने बाजी मारत नगर पंचायत क्रिकेट चष्काचे पहिल्या क्रमानकाचे खरे मानकरी ठरले तर द्वितीय क्रमांक प्रभाग क्र ६ आणि तृतीय प्रभाग क्र १६ ने पटकावले. विजेत्या संघाचे सर्वानी हार्दिक स्वागत करत नगरात याही पलीकडे जाऊन न प प्रशासनाने अनेक कार्यक्रमाचे चषकाप्रमाणे आयोजन करुण नगरात बंधुभावाचे वातावरण कसे निर्माण होईल यासाठी प्रयत्न करावा अशा शुभ कामना दिल्या ….



