जि.प.उच्च प्राथ.आदर्श शाळा पाथरी येथे प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न……
जि.प.उच्च प्राथ.आदर्श शाळा पाथरी येथे प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न……
सावली ( लोकमत दुधे
जि.प.उच्च प्राथ.आदर्श शाळा पाथरी येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री.प्रफुल्ल तुम्मे उपसरपंच तर उद्घाटक म्हणून श्री.नितीन दुवावर सामाजिक कार्यकर्ते हे होते.कार्यक्रमाचे उद्घाटक श्री.नितीन दुवावार यांनी शाळा ही समाज घडविण्याचे काम करणारी एकमेव संस्था आहे, शाळा आणि समाजात एकोपा असला की गावाची नक्कीच प्रगती होते आणि हा एकोपा,पालकांच्या शाळेविषयी असणाऱ्या आपुलकीतून आज दिसतो आहे त्यामुळे पुढील काही दिवसात पाथरी येथील शाळा नक्कीच आदर्श शाळा म्हणून इतरांसाठी आदर्श ठरेल असे मनोगत आपल्या उदघाटनिय भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.प्रफुल्ल तुम्मे उपसरपंच पाथरी यांनी शाळेत सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांची प्रशंसा केली. शाळेला आवश्यक त्या सर्व बाबतीत नेहमीच सहकार्य करण्याची हमी दिली.*
सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध नकलाच्या माध्यमातून अंधश्रद्धा, शिक्षण व व्यसनमुक्ती या विषयावर उपस्थित जनसमुदायाचे मनोरंजनासोबतच प्रबोधन केले. सोबतच आदिवासी नृत्य,कोळी नृत्य, देशभक्तीपर व लावणी अशा विविध प्रकारचे आकर्षक नृत्यप्रकार सादर करून उपस्थित जनसमुदायाचे मनोरंजन केले.
याप्रसंगी नाविन्यपूर्ण उपक्रमात तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे नाव उंचावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सोबतच इयत्ता पाचवीत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना वा. ढे.रामटेके गुरुजी स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाथरी गावच्या सरपंच सौ.अनिताताई ठिकरे, श्री.तुकाराम पा. ठिकरे माजी उपसभापती पं. स.सावली, श्री.दिलीप जाधव माजी पं. स.सदस्य,श्री.दिलीप करकाडे अध्यक्ष शा. व्यवस्थापन समिती, श्री.अमित ठिकरे तंटामुक्ती अध्यक्ष, श्री.राजेंद्रजी अढिया शिक्षणप्रेमी, श्री.लोमेश बोरेवार केंद्र प्रमुख, ग्रा. पं. सदस्य श्री.गिरीधर मेश्राम, श्री.विलास जुमनाके, श्री,मिलिंद ठिकरे,सौ.प्रीती लाडे,सौ.अल्का वाघधरे,सौ.आशा हजारे, सामाजिक कार्यकर्ते श्री. चेतन अंबादे, श्री. मुकेश मेश्राम अध्यक्ष सेवा सह.सोसायटी, श्री. डॉ.प्रमोद सोनवाणे, श्री.दिपक दाजगाये, श्री. दिलीप पा. ठिकरे माजी सरपंच, श्री.अशोक ठिकरे, श्री. शंकर जागटवार, श्री. मुळे, श्री. संदिप रत्नावार, श्री. दिपक रामटेके,श्री. सचिन शेंडे, श्री. सुजित भसारकर पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.
उदघाटनिय कार्यक्रमाचे संचालन श्री. संतोष सिडाम सर,प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे.बी. वाढई सर यांनी केले तर श्री.सुनिल लोनबले सर यांनी आभार प्रदर्शन केले.
प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री.योगेश पवार सर याच्या मार्गदर्शनात इयत्ता सातवीचे विद्यार्थी कु.श्रुती गावंडे व छत्रपती शेंडे यांनी केले, कार्यक्रमाचा समारोप श्री. कमलनयन बोरकर सर यांनी सर्वांचे आभार मानून केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, शालेय बालमंत्रीमंडल,माता पालक गट,सर्व पालक यांनी योग्य सहकार्य केले …..



