Vidarbh24News

Latest Online Breaking News

गोठ्यातून बैल नेले चोरट्याने पळवून

गोठ्यातून बैल नेले चोरट्याने पळवून

पोलिस प्रशासन याकडे लक्ष देईल काय ?

सावली शहरापासून चार किलोमिटर अंतरावर असलेल्या केशरवाही येथील शेतकरी अमित पत्रूजी भोपये यांच्या गोठ्यातील 24 जानेवारीला रात्री अंदाजे दोन ते तिन वाजताच्या दरम्यान दोन बैल चोरट्याने पळवून नेले. तसेच भारपायली येथील होमदेव नर्मलवार तसेच प्रविण खोब्रागडे यांच्याही गोठ्यातील प्रत्येकी एक एक बैल चोरट्याने पळवून नेले. याची रितसर तक्रार सावली पोलिस स्टेशनला दिलेली आहे.
यापूर्वी सावली शहरातील पत्रकार सूरज बोम्मावार यांची दुचाकी चोरीला गेलेली होती ती अजुन पर्यंत पोलीसांना सापडली नाही. एक आठवड्यापू्वी गब्बर दुधे यांची दुचाकी चोरीला गेले ती सुध्दा सापडली नाही. सदर घटनावरून असे दिसते की. सावली तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढलेले आहे.
याकडे पोलिस प्रशासन लक्ष देईल काय? आणि हरवलेले बैल आणि दुचाकी परत मिळेल असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांचे पडला आहे आणि या समोर असा प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासन कोणती खबरदारी घेतात याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!