*सावलीत हळदी कुंकू, विविध कार्यक्रम, व सत्कार समारंभ*
*सावलीत हळदी कुंकू, विविध कार्यक्रम, व सत्कार समारंभ*
+गानली समाज सावलीचे आयोजन+
*सावली*–( बाबा मेश्राम)—-गानली समाज सावलीच्या वतीने नुकताच पत्रकार भवनात हळदी कुंकू, विविध कार्यक्रम, व सत्कार.समारंभ आयोजित करण्यात आला ,सदर कार्यक्रमात सावली येथील परिचित स्वच्छतादुत ,सर्वधर्म समभाव संघटनेचे अध्यक्ष ,परेशभाई तावाडे यांचा रोख रक्कम, शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला,
नेहमीच लोकापयोगी कामे करणारा, गरजवंताच्या मदतीस धावुन जाणारा, स्वच्छतेचा वसा घेऊन नेहमीच पोस्ट आफिस, पोलीस स्टेशन, गोळीबार चौक, वाचनालय,मेन रोड येथील केर कचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट करणाऱ्या ,सोबतच लोकसहभागातून लोकोपयोगी कामे करणारे परेशभाई तावाडेचा ,गानली समाज आयोजित हळदीकुंकू ,व सत्कार समारंभ कार्यक्रमात गौरविण्यात आले,
विविध कार्यक्रमाचे आयोजन सुध्दा या समाजाने केले,यात रव्या पासून पदार्थ बनविणे या स्पर्धेत सुनिता चल्लावार,माचीस पासून वस्तू बनविणे यासाठी अल्का संगीडवार, ग्रुप आफ द डे या स्पर्धेत मध्यान ग्रुप ,आदींनी मान्यवरांच्या हस्ते पारीतोषिक देण्यात आले,
कार्यक्रमाची सुरुवात साई बाबाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली, प्रास्ताविक रिंकी सुरमवार, संचालन निलम सुरमवार, तर आभार पल्लवी सुरमवार हिने मानले,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक मंडळातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले…



