सुनिताताई मरस्कोल्हे यांची महिला अभाआविपचे प्रदेश संघटन सचिवपदी नियुक्ती
सुनिताताई मरस्कोल्हे यांची महिला अभाआविपचे प्रदेश संघटन सचिवपदी नियुक्ती …..
सावली ( लोकमत दुधे )
मध्य प्रदेश इंदोर येथील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशना प्रसंगी विविध प्रांतातील आजीवन सदस्य असलेल्या जेष्ठ युवक महिला प्रांतीय पदाधिकारयांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्याचवेळी राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती उर्मिला सिह मार्को यांचे कडून सुनीताताई मरस्कोल्हे यांची महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटन सचिवपदी नियुक्ती करण्यात आली नियुक्तीचा आदेश सुनीता मरस्कोल्हे यांना आदिवासी सेवक तथाअभाआविपचे प्रदेश महासचिव केशव तिराणिक यांचे शुभ हस्ते देण्यात आला यावेळी परिषदेचे जेष्ठ दादाराव टारपे, प्रदेश मुख्यालय महा सचिव विलास वाघमारे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष जनर्धान गेडाम, चंद्रपूर जिल्हायुवाध्यक्ष अतुल कोडापे आदींची उपस्थिती होती.
उपस्थितांनी सुनिताताईंना अभिनंदनासह पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या …….



