Vidarbh24News

Latest Online Breaking News

*कवठी येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ग्रंथदिंडी आणि ग्रंथ कलश प्रभातफेरी*

*कवठी येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ग्रंथदिंडी आणि ग्रंथ कलश प्रभातफेरी*

✍️टिकाराम म्हशाखेत्री
सावली तालूका प्रतिनिधी ✍️

मूल :- ग्रंथदिंडी आणि ग्रंथ कलश प्रभातफेरी काढून कवठी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.शहीद सुरेश पाटिल सुरकर विदयालय आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या संयुक्त विदयमाने हा कार्यक्रम पार पडला.ग्रंथ दिंडी आणि ग्रंथ कलश प्रभातफेरीत सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावरील गीते,अभंग सादर करण्यात आली.यावेळी गीतातून शिक्षणाचे महत्व सुदधा पटवून देण्यात आले.टाळ,मृदुंगाच्या गजरात गावातून काढण्यात आलेल्या प्रभातफेरीमध्ये येथील भजनीमंडळी सहभागी झाली होती.प्रभात फेरी मध्ये विदयार्थींनींचे लेझीम पथक,बंॅड पथक सुदधा सहभागी झाले होते.त्यानंतर शहीद सुरेश पाटिल सुरकर विदयालयात झालेल्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवठी येथील सरपंचा कांताबाई बोरकूटे हया होत्या.प्रमूख अतिथी म्हणून शहीद सुरेश पाटिल सुरकर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तुकाराम पाटिल सुरकर,उपसरपंच विलास बटटे,ग्रामपंचायत सदस्य राकेश घोटेकार,मनिषा कोसरे,अंगणवाडी शिक्षिका शशिकला राउत,जि.प.चे मुख्याध्यापक नैताम,जेष्ठ नागरिक नायबनकार,गुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते मुक्तेश्वर राजूरकर,माजी सरपंच डोपाजी बटटे,सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास बटटे,शहिद सुरेश पाटिल सुरकर विदयालयाचे मुख्याध्यापक के.व्ही.खोब्रागडे उपस्थित होते.

यावेळी का्रंतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले.पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शिक्षणाशिवाय पर्याय नाही.विदयार्थ्यांनी सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतीराव फुले यांचा आदर्श समोर ठेवून शिक्षणाचे महत्व ओळखले पाहिजे.लेखन, वाचन आणि मनन या तिनही गोष्टी विदयार्थ्यांनी आत्मसात कराव्यात असे विचार मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक के.व्ही.खोब्रागडे यांनी सादर केले.संचालन विदयालयाची विदयार्थींनी पायल गोहणे आणि पाहुण्यांचे आभार केशवी पाल या विदयार्थीनीने मानले

.जयंती कार्यक्रमानिमित्त शाळेच्या विदयार्थींनी नऊवारी लुगडे नेसून सावित्रीबाई फुले बनल्या.तर काही विदयार्थी बंगाली पायजमा, धोतर आणि जॅकेट घालून महात्मा फुले यांच्या सारखा वेष धारण केले.या विदयार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रभात फेरीत शहीद सुरेश पाटिल सुरकर विदयालयाचे सहा शिक्षक व्हि.डी.हजारे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर गीते आणि अभंग सादर केली.त्यांना भजनी मंडळीनी साथ दिली. ग्रंथ दिंडी आणि विदयार्थ्यांची प्रभातफेरी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहिद सुरेश पाटिल सुरकर विदयालय आणि जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सावित्रीच्या लेकी,विदयार्थी आणि गावकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!