*प्रियदर्शन मडावी यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार जाहीर*
*प्रियदर्शन मडावी यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार जाहीर*
*सावली, विदर्भ 24 न्युज*
नागपूर येथील’मदत’ या सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा राज्यस्तरीय सामाजिक “डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार” मूल येथील शिक्षक प्रियदर्शन मडावी यांना प्रदान करण्यात आला.मदत सामाजिक संस्था नागपूर द्वारा २० वे राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता सम्मेलन व पुरस्कार सोहळा दि.२६ डिसेंबर२०२२ रोजी श्री,गुरुदेव सेवाश्रम,आग्याराम देवी चौक सुभाष रोड नागपूर येथे आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.गिरिषभाऊ पांडव,संचालक राधिकाबाई पांडव चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर,प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉ नितीन राऊत आमदार,तथा माजी ऊर्जामंत्री व पालकमंत्री,मा.अभिजित वंजारी आमदार वि.प.,मा.प्रा.जोगेंद्रजी कवाडे,आमदार वि.प.तथा लाँगमार्च नेते,मा.तक्षशिला वाघधरे सिने कलावंत चित्रपट ‘नाळ’,मा.रमेश लोखंडे उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता नागपूर यांची उपस्थिती होती. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना संस्थेच्या वतीने दरवर्षी सामाजिक पुरस्कार प्रदान केला जातो.यावर्षीचा राज्यस्तरीय सामाजिक डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार मु.पो.गोवर्धन ता.मूल जि.चंद्रपूर येथील जि. प.उच्च प्राथमिक शाळा पेंढरीमक्ता येथे विषय शिक्षक या पदावर कार्यरत असलेले श्री,प्रियदर्शन मोरेश्वरजी मडावी यांना आकर्षक स्मृतिचिन्ह ,दुपट्टा,पुष्पगुच, प्रमाणपत्र व संविधानाचे पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आला. प्रियदर्शन मडावी हे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असतात.आदिवासी समाज प्रबोधनाचे कार्य करीत असतात.त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत वरील पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. मिळालेल्या पुरस्काराबद्दल प्रियदर्शन मडावी यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातुन अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.



