अखिल भारतीय मादगी संघटनेच्या वतीने महामानवास अभिवादन
अखिल भारतीय मादगी समाज संघटना (म. रा.) शाखा सावलीचे वतीने आज दिनांक ६ डिसेंबर ला स्टुडंट्स कॉम्पुटर सावली इथे भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. दीप प्रज्वलन तालुका अध्यक्ष/उपाध्यक्ष मा. सुनील कोरेवर आणि मा. रमेशभाऊ लाटेलवार यांचे हस्ते तर मालाअर्पण चंद्रपूर शहर अध्यक्ष म. श्री विजय गंगासागर आणि जिल्हा अध्यक्ष श्री अनिल बोटकावार यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्टुडंट्स कॉम्प्युटरचे मालक,संघटनेचे संघटक मा.रुपचंद लाटेलवार सर आणि आभार प्रदर्शन श्री अमित डोंगरे यांनी केले या महापरिनिर्वान दिनानिमित्त अखिल भारतीय मादगी समाज संघटनेच्या वतीने समाजभूषण गृपवार निबंध स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला यात विजेता समीप बाळकृष्ण गोरडवार हे विजेता घोषित केले गेले.या निबंध स्पर्धेचा बक्षीस श्री अनिल बोटकावार आणि गोलू नल्लुरवार यांचे असल्याने तुरंत फोन पे वर वितरित करण्यात आले. याप्रसंगी कोषाध्यक्ष रोहित आलेवार ,भूषण गेडाम रवी संतोषवार,सौ मानसी लाटेलवार व इतर उपस्थित होते.



