ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल …
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल ..*बोथली , गेवरा बुज,नवेगाव तुकुम ग्रामपंचायतिचा समावेश ** 3 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एकुण 12 उमेदवारी अर्ज, तर सदस्य पदासाठी 49 उमेदवारी अर्ज दाखल ** सतान्तरासाठी परिवर्तन प्यानल निवडणुकीच्या मैदानात *

१८ डिंसेबर २०२२ रोजी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात महत्त्वाचा व शेवटचा स्तर समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकाचा ज्वर राज्यभर चढु लागला,ग्रामीण भागात सुध्दा राजकीय वातावरणात तापु लागले आहे, जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या असुन यामध्ये सावली तालुक्यातील बोथली ,(सरपंच, सर्वसाधारण), एकुण मतदार १७११ यामध्ये पुरुष ८४९ महिला ८६२,
गेवरा बुज ग्रामपंचायत (सर्वसाधारण)एकुण मतदार ११५२ ,पुरुष ५७१,महिला ५८१,
नवेगाव तुकुम ग्रामपंचायत (ना.मा.प्र महिला) एकुण मतदार ५८१ पुरुष २९२ ,महिला २६१ अशा तीन ग्रामपंचायत चा समावेश असून. ३४१४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, त्यामुळे प्रशासकीय भवनात नामांकन भरण्यासाठी ग्रामीण जनतेची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
आज दि(5 डिंसे) नामांकन फार्म ची छाननी करण्यात आली यात बोथली ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सरपंच (सर्वसाधारण) 7 नामांकन ठेवण्यात आले,तर 9 सद स्यासाठी 30 फार्म आले होते ,यात 1फार्म अपात्र ठरविण्यात आल्याने 29 उम्मेदवारी अर्ज होते,तर
गेवरा बुज ग्रामपंचायत मध्ये सरपंच(सर्वसाधारण) पदासाठी 3 उमेदवार उभे आहेत तर सदस्य पदासाठी 15 उमेदवारी अर्ज ठेवण्यात आले तसेच
नवेगाव तुकुम सरपंच(ना.मा.प्र महीला) पदासाठी 2 उमेदवार उभे आहे ,तर.7 ग्रामपंचायत सदस्य पैकी 4जागा अविरोध असल्याने ,निवडुन द्यायच्या 3 ग्रामपंचायत सदस्यासाठी 5 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत, तरीपण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख( 7 डिंसे) असल्याने नेमके चित्र त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे….सावली तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापु लागले आहे, ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रीय, प्रादेशिक पक्षाचे अधिकृत चिन्ह नसले तरी निवडणुकीसाठी भाजप,कांग्रेस, वंचित बसपा आदी पक्षाने आप आपले उम्मेदवार उभे केले असून बोथली ग्राम प निवडणुकीमधे नाव्यानेच परिवर्तन प्यानल मैदानात उतरल्याने बोथली ग्रा प निवडणूक रंगतदार होणार आहे …..



