अ.भा. मादगी संघटनेचा मुल पोलिस स्टेशन ला दमदार घेराव
अ.भा. मादगी संघटनेचा मुल पोलिस स्टेशन ला दमदार घेराव
आरोपीवर अट्रासिटी गुन्हा नोंदवून अटक करण्याची मागणी
मूल तालुक्यातील गोंडसावरी येथील लता अनिल चंदावार या महिलेवर एका महिन्यापूर्वी गावातील एका माथेफिरू व्यक्तीने शुल्लकशा दळनाचे पैसे दिले नाही म्हणून मारहाण केली होती. परंतु त्या व्यक्तीवर कोणत्याच प्रकारची कायदेशीर कारवाही करण्यात आली नव्हती.

लताच्या नवऱ्याने तिला गडचिरलीच्या सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते. ही बातमी अ.भा. मादगी संघटनेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष ना माहिती झाली त्यानंतर ते स्वतः जिल्हा सामान्य रुग्णालयात लता ला भेटायला गेले. तिची गंभिर परिस्थिती पाहून आज मुल पोलिस स्टेशन वर घेराव करण्यात आले. शंकर लोनगाडगे या नराधामावर अट्रासिटी कायद्या नुसार अटक करुन कायदेशिर कारवाई करावी यासाठी पोलीस स्टेशन मूल येथे निषेधार्थ निवेदन सादर करून ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा निवेदनातून इशारा दिला,यावेळी अखिल भारतीय मादगी समाज संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा.दिपकदादा बोलीवर , प्रदेश उपाध्यक्ष मा. किशोर पगळपलीवार, प्रदेेश सहसचिव मा. विशाल सांयकार, जिल्हाध्यक्ष मा. अनिल बोटकावार, ऑल इंडिया पॅथर चे जिल्हाध्यक्ष मा. निमसरकार सर, अ.भा. आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष मा. अतुल कोडापे सर , प्रशांत उराडे सर, गजु आलेवार, चंदन बोईनवार, पिडीत परीवार असे विविध सामाजिक संघठना, पदाधिकारी व एकत्रीत समाज बांधव उवस्थित होतें.



