उत्कर्ष आदेची कराटे स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड
उत्कर्ष आदेची कराटे स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड
भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्ववारा संचालित विश्वशांती विद्यालय सावली येथील वर्ग 10 वा अ चा विद्यार्थी उत्कर्ष आदे याची उद्या चंद्रपूर येथे होणार्या जिल्हा क्रिडा कराटे चॅम्पियन स्पर्धेसाठी निवड झाली. सदर स्पर्धेसाठी तो सावली तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार असल्यामुळे तालुक्यातील जनतेने उत्कर्ष आदेचे अभिनंदन केले आहे.
जिल्हा स्तरावर होणार्या कराटे स्पर्धेसाठी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय संदिपभाऊ गड्डमवार, सचिव माननीय राजाबाळ पाटिल संगिडवार व सोबत विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय रविंद्र मुप्पावार सर, पर्यवेक्षक राऊत सर, क्रिडा शिक्षक गाडगे सर आणि विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी उत्कर्ष आदेला पुढिल कार्यासाठी शुभेच्छा दिलेले आहे.



