तारुण्यभान – जीवन शिक्षण कार्यशाळा संपन्न ……
तारुण्यभान – जीवन शिक्षण कार्यशाळा संपन्न ……
* विकास विद्यालयाचा उपक्रम *
सावली ( लोकमत दुधे )
तालुक्यातील विहीरगाव येथील विकास विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे सर्च चातगाव व सोबत फॉउंडेशन चंद्रपूर च्या वतीने तीन दिवशीय तारुण्यभान – जीवन शिक्षण कार्यशाळा दिनांक दिनांक २१ ते २३ या कालावधीत संपन्न झाली, या कार्यशाळेला महाविद्यालयातील २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कार्यशाळेचा लाभ घेतला.
कार्यशाळेच्या उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सौ.गराटे, सर्च येथील जीवन शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर पाटील, प्रशिक्षक सुनंदा खोरगडे, राजेंद्र इसासरे, सोबत संस्थेचे प्रमुख डॉ. म्हस्के तसेच संस्थेचे कार्यकर्ते च विकास विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
वयात येतांना होणारे शारीरिक, मानसिक बदल, प्रेम, आकर्षण व मैत्री यातील फरक, प्रजनन इंद्रिये रचना व कार्य, मासिक पाळी, काळजी व स्वच्छता, स्वप्नदोष समज गैरसमज, बेजबाबदार लैंगिक वर्तनातून निर्माण होणाऱ्या समस्या, मुलगा मुलगी कशी ठरते,, जुळी मुले कशी होतात याची कारणे, गुप्तरोग व एड्स तसेच किशोरवयीन विद्यार्थ्यामध्ये तंबाखू, गुटखा, दारू, व्यसनविरोधी जागृती घडवून आणणे हा शिबिराचा हेतू होता, या शिबिरात स्लाईड प्रोजेक्टर द्वारे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
कार्यशाळेत या सर्व सविस्तर माहिती देण्यात आली, त्याचबरोबर खेळाच्या माध्यमातून नातेसंबंध, आत्मविश्वास वाढविणे, सवांद कौशल्य, संघटन कौशल्य, संगत या विषयावर माहिती देऊन जागृती करण्यात आली. या शिबिराचे संचालन प्रा. डॉ. गावंडे यांनी तर आभार प्रा. कोचे यांनी मानले, कार्यशाळेच्या यशस्वीते साठी सोबतचे आरोग्य सहाय्यक विवेक राऊत, प्रशिक्षनार्थी पल्लवी हुलके, शिल्पा पाल व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले ……



