आयुष संजीवनी अॅप इंस्टाल करण्याचे भारत सरकारचे आव्हाहन
आयुष संजीवनी अॅप इंस्टाल करण्याचे भारत सरकारचे आव्हाहन
कोरोना महामारीमुळे जगभरात लाखो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. आपल्याही देशात आजपर्यंत 2,86,569 लोक संक्रमित झाले आहेत. कोरोनाची वाढ गुणोत्तर पद्धतीने होत आहे. या संक्रमण वाढीवर उपाय म्हणून भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने एक अप्प तयार केला आहे त्याचे नाव आहे.“आयुष संजीवनी”
https://play.google.com/store/apps/details?id=com.negd.ayushfeedback
कोरोनाला हरविण्यासाठी टेस्ट करणे आवश्यक आहे. टेस्टिंग करणापूर्वी कोणकोणते लोक पॉझीटिव्ह आहेत त्यांची माहिती काढण्यासाठी आयुष संजिवनी ऍप इंस्टाल करणे आवश्यक आहे. या अॅपचे अनेक फायदे आहेत. आपण कोरोना पॉझीटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर हा अॅप आपल्याला अलर्ट करतो. आपल्या मोबाईलवर मॅसेज येतो. त्यासाठी प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अॅप इंस्टाल असणे आवश्यक आहे
अॅप इंस्टाल केल्यानंतर आयोग्याशी सबंधित काही प्रश्नांचे उत्तर आपल्याला द्यावे लागतील. जसे कि, आयुष मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शन तत्वाचे आपण पालन करता का? आपल्याला कोणती बिमारी आहे? या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर आपण किती सुरक्षित आहात हे कलर च्या माध्यमाने सांगते. आपण सुरक्षित असल्यास अॅप ग्रीन कलरमध्ये दिसतो व संक्रमांचा धोका असल्यास पिवळ्या कलरमध्ये दिसतो.
पूर्वीच्या “आरोग्य सेतू अॅप” मध्ये काही दोष असल्यामुळे जसे कि, ब्लुटूथ नेहमी चालू ठेवावा लागत होता त्याचबरोबर लोकेशनला क्लिक करावे लागत होते. या गोष्टी नागरिकांच्या लक्षात येत नव्हत्या म्हणून आयुष मंत्रालाने हा नवीन अॅप बनविला आहे. यामध्ये GPS तंत्रज्ञानामुळे आपण कुठे जातो, आपल्या संपर्कात किती व्यक्ती आले आहेत याची सर्व माहिती हा अॅप ठेवतो व आपल्या संपर्कात पॉझीटिव्ह व्यक्ती आल्यास आपल्याला तुरंत अलर्ट करतो.
या अॅप मध्ये भरलेली सर्व माहिती फक्त भारत सरकारकडे सुरक्षित राहील. इतर कुणालाही ही माहिती प्रसारित होणार नाही. हा अॅप पूर्णपणे सुरक्षित आहे. या अॅपच्या माध्यमाने कोणत्याच प्रकारचा गैरप्रकार(fraud) होणार नाही. एक सामाजिक जिम्मेदारी समजून, आपल्या घरी असलेल्या लहान-लहान मुलांचा व आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांचा विचार करून आयुष संजीवनी अॅप आपल्या देशाला एक नवसंजीवनी देण्यासाठी इंस्टाल करायचा आहे.



