संकल्प लाटेलवार ची नवोदय विद्यालयासाठी निवड
संकल्प लाटेलवार ची नवोदय विद्यालयासाठी निवड
नुकत्याच नवोदय विद्यालयाच्या 2022 चा निकाल घोषित झाला. यामध्ये स्टेला मॉरीस कॉन्व्हेन्ट बाम्हणवाडा तालुका राजुरा येथील संकल्प संजय लाटेलवार याची नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली आहे. संकल्प हा श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा प्रा. डॉ. संजय लाटेलवार यांचा मुलगा असून संकल्पच्या यशाचे श्रेय त्याने त्याचे आईवडील त्याचे मार्गदर्शक अरविंद भगर सर, स्टेला मारिस कॉन्व्हेन्ट चे प्रिन्सिपाल मिस एल्फी जोसेफ व त्यांचे सहकारी शिक्षक यांना दिलेले आहे.
संकल्प चे अभिनंदन त्याचे आजोबा केशवराव लाटेलवार,रुपचंद लाटेलवार, विनोद लाटेलवार, शेजारी प्रा. डॉ. संजय शेंडे, प्रा. डॉ. अरुण चिलके, प्रा. डॉ. राजेंद्र मुद्दमवार प्रा.डॉ. विशाल दुधे ,सर्व शिक्षक वृंद त्याचबरोबर सर्व आप्त स्वकीयांनी केलेले आहे.



