वणी महाविद्यालयात शिकणारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता….
•बेपत्ता वणी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
•तालुक्यात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले….
वणी( 14 मे ):– शहरातील १६ वर्षीय मुलगी ६.५.२०२२ शुक्रवार रोजी सकाळी बेपत्ता झाली. तिला फूस लावून पळविण्यात आले असावे, असा संशय पालकाने त्यांचा तक्रारीतून व्यक्त केला. यावरून वणी पोलिसांनी कलम भांदवी कलम 363 नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, बेपत्ता मुलीचा शोध घेतला जात आहे. पण अवघे ८ दिवस उलटूनही मुलीचा थांगपत्ता लागलेला नाही.वणी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.

वणीत शहरातील एका नामांकित विद्यालयात 11 वित् शिक्षण घेत आहे. त्या अल्पवयीन मुलीची उंची साडेपाच फूट,वर्ण सावळा,निळा जीन्स-टी शर्ट असा या अल्पवयीन मुलीचे वर्णन आहे.

सध्या अल्पवयीन मुलींचे घरून बेपत्ता होण्याचे प्रमाण तालुक्यात चांगलेच वाढले आहे. अल्पवयीन मुलींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना फूस लावून पळवले जात आहे. आई वडिलांचा विश्वास धुळीस मिळवून त्यांच्या न कळत अल्पवयीन मुली घरून पलायन करू लागल्या आहे. शिक्षण घेण्याच्या वयात मार्ग भटकू लागल्या आहेत. कुणाच्याही भूलथापांना बळी पडून चुकीच्या मार्गाकडे वळू लागल्या आहे.
आयुष्य घडवण्याच्या वयात आयुष्य उध्वस्त करू लागल्या आहे. गाव खेड्यातील व गरीब घरातील मुली घरून पळून जाण्याच्या घटना चांगल्याच वाढल्या आहे. अश्यातच शुक्रवार दि 6.5.2022 ला याबाबत अल्पवयीन मुलीचा वडिलांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने पोलिसांनी भांदवी ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 



