अॅड कुणाल चोरडिया यांचा वाढदिवसानिमित्त आज भव्य रोग निदान शिबीर…..
•बाजोरिया हॉल येथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजे
•संपर्क नोंदणी करीता अजिंक्य शेंडे 9096358002, उमेश पोद्दार – 99227 78814
वणी (14 मे):– पारसमल प्रेमराज ज्वेलर्स वणी यांचे विद्यमाने व अरिहंत हॉस्पिटल नागपूर यांच्या सहकार्याने अॅड. कुणाल विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज १४ मे रोजी शनिवारला सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत बाजोरिया हॉल वरोरा रोड येथे आयोजन करण्यात आले आहे. 

य शिबीरात नागपूर येथील डॉ. उत्कर्ष शाह तथा इतर तज्ञ डॉक्टर व डॉ. रोहित चोरडिया हे उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात नेत्र तपासणी, ह्रदय रोग तपासणी, दंत व नाक, कान, घसा यासंबंधीच्या आजरांची मोफत तपासणी करुन उपचार केले जाणार आहे. कानाचा बधिरपणा आलेल्या रुग्णांना श्रवणयंत्रही देण्यात येणार आहे.
रोग, दंत चिकित्सा, नाक-कान-घसा स्त्रिरोग तपासणी व इतर आजारांवर तपासणी करून संबंधित रुग्णांना मोफत श्रवन यंत्र व मोफत औषधी वाटप करण्यात येणार आहे. तसेच सर्व रूग्णांकरीता चहा व भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. शिबिराचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करीता अजिंक्य शेंडे, ९०९६३५८००२, श्याम बडघरे, ९९२३३३४१४५, कैलास बिलोरिया ९९२११२४९०३, मयुर गोयनका, ९८२२२९८७१० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



