Vidarbh24News

Latest Online Breaking News

मारेगाव येथील रस्ता प्रकरणी उपोषणाची लेखी आश्वासना नंतर सांगता

• गजानन किन्हेकर,गौरीशंकर खुराणा, नंदेश्वर आसुटकर यांनी केली मध्यस्थी

मारेगाव (12 मे ):- शेतात जाण्यास प्रचंड अडथळा निर्माण झालेल्या डी. फॉर्म. कॉलेज कडील रस्ता तत्काळ खडीकरण करून दुरुस्त करण्यात यावे. व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या प्रमुख मागणीसाठी प्रभाग क्रमांक एक व दोन मधील नागरिक दि.१२ मे पासून नगरपंचायत कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले होते.यात नगर पंचायत प्रशासनाच्या लेखी आश्वासन नंतर गजानन किन्हेकर,गौरीशंकर खुराणा, नंदेश्वर आसुटकर यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता करण्यात आली.

येथील प्रभाग क्रमांक एक मधील सरकारी विहिरीपासून डिफॉर्म कॉलेज कडे जाणार रस्ता अनेक वर्षांपासून आहे. या रस्त्याने येथील प्रभाग एक व दोनचे नागरिक शेतात जाण्यासाठी नेहमी येजा करतात.मात्र सदर रस्त्याने प्रभागातील सांडपाण्याने या रस्त्याची अखी वाट लागली आहे.त्यामुळे येथील नागरिकांना येजा करण्यास नाहक त्रासाला समोर जावे लागत आहे.

वेळो वेळी ही बाब प्रशासनाचे निदर्शनास आणुन दिली असता यावर दुर्लक्ष करत असल्याने नगरपंचायत समोर रस्ता प्रकरणी उमेश चिंचुलकर , शेख अनवर , जीवन सातपुते , हरिदास चिंचुलकर , राजेंद्र राजूरकर , सतीश बदकी , अतुल देवगडे आदी उपोषण कर्त्यांनी येथील नगरपंचायत समोर आंदोलन सुरू केले होते.

दरम्यान गजानन किन्हेकार, गौरी खुराणा, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, अनिल गेडाम यांनी मध्यस्थी करुन उपोषण कर्ते व नगर पंचायत प्रशासन यांच्याशी चर्चा केली व नगर पंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्या नंतर गौरी खुराणा व गजानन किन्हेकार, नंदेश्वर आसुटकर यांच्या हस्ते जूस पाजुन उपोषण सोडविण्यात आले.व उपोषणाची सांगता करण्यात आले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!