कला महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्राचे वितरण व पीएच.डी. प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार
– उत्कृष्ठ लेखन कार्याबद्दल प्रा.डॉ.अशोक यावले सन्मानित
मारेगाव 11मे :- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे पदवी प्रमाणपत्राचे वितरण सोहळा व पीएच.डी. प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी उत्कृष्ट लेखन कार्याबद्दल प्रा. डॉ. अशोक यावले यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवुन सन्मानित करण्यात आले.
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बी.ए., बी.कॉम व बी एस्सी मध्ये पदवी परीक्षा उतीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित केला होता. या सोहळयात तिनही शाख्येच्या मिळून एकूण २३३ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.व पीएच.डी. प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. जीवन पाटील कापसे उपस्थित होते. मानवी जीवनात संघर्षातूनच परीवर्तन घडवून आणले जाते असे मत त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. तसेच डॉ. शशिकांत आस्वले यांचे शुभहस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. वर्तमान काळातील आपले प्रयत्न हेच आपणास जागतिक महासत्ता बनवेल असे विचार त्यांनी विचार पिठावरून व्यक्त केले. त्याच बरोबर त्यांनी प्राचिन काळातील भारतातील वैज्ञाणिक विकास व प्रगतिचा इतिहास सुद्धा आपल्या भाषणातून सांगितला. या प्रसंगी बोलतांना प्राचार्य डॉ अविनाश घरडे सरांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील वेगवेगळ्या संधी सांगितल्या.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. गजानन सोडनर व डॉ विनोद चव्हाण यांनी केले. डॉ. आस्वले सरांचा परीचय प्रा. शैलेश कांबळे सरांनी केला तर प्रा. अक्षय जेनेकर यांनी सर्वांचे आभार मानले. डॉ. सदिप केलोडे, डॉ. विभा घोडखांदे, प्रा. बाळासाहेब देशमुख, डॉ. प्रविण कुलकर्णी, प्रा. राजश्री गडपायले, डॉ. मंजु परदेसी, डॉ अनिल अडसरे, प्रा. शैलेश आत्राम, प्रा. रूपेश वांढरे, डॉ नितेश राउत, प्रा. स्नेहल भांदककर, डॉ. मिनाक्षी कांबळे श्री. दिपक मनवर ..श्री. रवी परचाके व महाविद्यालयीन विदयार्थी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता मोलाचे प्रयत्न केले.



