पिसगाव सोसायटीच्या अध्यक्ष पदी सुदर्शन टेकाम तर उपाध्यक्ष पदी गणुजी थेरे
मारेगावं (10 मे ) :- तालुक्यातील पिसगांव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये आज 10 मे रोजी अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाची निवड पार पडली. यात अध्यक्ष पदी सुदर्शन टेकाम तर उपाध्यक्षपदी गणूजी थेरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

ही निवड प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून शासकीय अधीक्षक गवई साहेब व संस्थेचे सचिव दिपक ठावरी यांनी काम पाहले.यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारोती गौरकार, अंकुश माफुर, सदाशिव नारायण मांदाडे, शुक्रात दूधकोहळे, हनुमान जुमनाके ,अजनी सिडाम, श्रीराम गेडाम, शंकर बावणे, गणेश बावणे, सोनु झाडे,आदी उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित संचालन मंडळातील गणुजी थेरे, सुदर्शन टेकाम ,भुषण कोल्हे, राजु पाचभाई ,श्रीकृष्ण मडावी, विजय घोरपडे, फकरु कुमरे, विनोद आत्राम, दिवाकर हस्ते, रामकिसन येरकाडे, गुणवंत मडावी, वंदना सीडाम ,फुलबाई जुमनाके,यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून सर्व संचालक मंडळांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या.





