कुंभा येथे वाचनालयात ग्रंथ देणगी करून महाराष्ट्र दिन साजरा
मारेगाव:- 1 में महाराष्ट्र दिना निमित्त स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय कुंभा येथे सरपंच अरविंद ठाकरे यांचे हस्ते नागरिकांना ग्रंथ वाटप करून महाराष्ट्र दिन व ग्रंथ देणगी सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष केशवराव भोयर यांचे हस्ते ध्वजारोहन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.या कार्यक्रमास कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे, उपसरपंच गजानन ठाकरे,ग्रामविकास अधिकारी विजय उईके,तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी,तलाठी,अंगणवाडी सेविका,गावातील प्रतिष्ठित नागरिका सह वाचक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.


महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन प.स.उपसभापती तथा शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय आवारी यांचे मार्फत स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय कुंभा यास सरपंच अरविंद वसंतराव ठाकरे यांचे हस्ते ग्रंथ देणगी देवुन,ग्रंथ देणगी सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी ग्रंथपाल गजानन कोकुडे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



