अरेच्चा!!!! महिला ग्रा.प.सदस्याच्या पतीकडुन ग्रामसेवकास मारहाण..
•सदस्याच्या पतीवर विविध कलमानव्ये गुन्हा दाखल तर ग्रामसेवका विरोधातही विनयभंगाची तक्रार
•ग्रामपंचायत चिंचमंडळ येथील घटना
मारेगाव (30 जुन):- ग्रामपंचायतच्या मासिक सभेत एका महिला ग्रा.प.सदस्याच्या पतीने चक्क ग्रामसेवकाला मारहाण केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील ग्रा.प. चिंचमंडळ येथे 29 एप्रिल च्या दुपारी 12.30 वाजता सुमारास घडली.या प्रकरणी महिला ग्रा.प.सदस्याच्या पतीचे विरोधात विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे महिला सदस्यांनी सुद्धा ग्रामसेवका विरोधात थेट विनयभंगाची तक्रार काल रात्री उशिरापर्यंत मारेगाव पोलिसात दिल्याने शासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.दिवाकर नामदेव सातपुते (47) रा.चिंचमंडळ असे ग्रामसेवकास मारहाण केल्या प्रकरणी विविध कलमानव्ये गुन्हे दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.


प्राप्त माहिती नुसार फिर्यादी किशोर चिंधाजी खरात (43) हे ग्राम पंचायत चिंचमंडळ येथे ग्रामसेवक या पदावर गेल्या दहा महिन्यापासून कार्यरत आहे.तर आरोपी दिवाकर सातपुते यांची पत्नी सौ.भाग्यश्री सातपुते या ग्रा.प.सदस्य आहे.फिर्यादी ग्रामसेवक खरात हे मासिक सभेच्या तयारीत कर्तव्यावर असताना महिला सदस्या भाग्यश्री सातपुते व यांचे पती माजी उपसरपंच दिवाकर सातपुते कार्यालयात आले असता फिर्यादी ग्रामसेवक खरात यांना मागील दिलेल्या पाणीपुरवठा संदर्भात अर्जाची माहिती मागितली. ग्रामसेवक खरात यांनी मिटिंग झाल्यावर सर्व सदस्या सह तुम्हाला पण क्षेरॉक्स कागदपत्राद्वारे माहिती देणार असल्याचे सांगितले. दरम्यान दिवाकर सातपुते यांनी ग्रामपंचायतच्या मासिक सभेच्या सदस्यांचे रजिस्टर वर जबरदस्तीने लिखाण करुन आपले अभिप्राय मांडण्याचा प्रयत्न केला.
ग्रामसेवक खरात यांनी सातपुते हे ग्रा. प. सदस्य नसल्याने थेट कायदेशीर नकार दिला असता, दोघात चांगलाच शाब्दिक वाद निर्माण झाला.हा वाद विकोपाला जावून सातपुते यांनी ग्रामसेवक खरात यांच्या थेट कानशिलात हाणली.व चष्मा उचलण्यासाठी खाली वाकले असता त्यांना कार्यालयात पाडून मारहाण केली.दरम्यान ग्रा. प.कार्यालयात उपस्थित कर्मचारी व इतरांनी हा वाद सोडवला.
दरम्यान फिर्यादी ग्रामसेवक खरात यांनी थेट मारेगाव पोलिसात धाव घेवून दिवाकर सातपुते याचे विरोधात तक्रार दाखल केली असता, शासकीय कामात अडथळा करून मारहाण करणे,जातिवाचक शिवीगाळ करून, धमकी दिल्याच्या आरोपाखाली दिवाकर सातपुते यांचे विरोधात भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 354,332,323,504,506,अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक आधीनीयम 1989 चे कलम 3(1)(M),3(1)(R),3(1)(S),3(2)(VA) अनव्ये गुन्हा दाखल करून सातपुते यांना अटक करण्यात आली.पुढील तपास उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार याचे मार्गदशनात ठाणेदार राजेश पुरी करत आहे.
” पतीवर गुन्हा दाखल होताच महिला ग्रा. प. सदस्यां यानी चक्क विनयभंग प्रकरणी ग्रामसेवका विरोधात काल रात्री उशिरापर्यंत तक्रार दिल्याने शासकीय वर्तुुुळात खळबळ माजली आहेे”



