प्रवाशांचा जीव मुठीत आणि वाहतूक अधिकारी वसुलीत व्यस्त….!!!
•हाकेचा अंतरावर वाहतूक पोलिस ठाण्यासमोरूनच केली जाते अवैध प्रवासी वाहतूक तरीही…मुंग गिळून का?
•ऑटोचालकाचा मुजोरीत वाढ…”क्योकि वसूलीभाई का सर पे हाथ “….!!!! -अशी खमंग चर्चा
वणी (29 एप्रिल):- तालुका मुख्यालयापासून ग्रामीण भागापर्यंत सर्वच रस्त्यांवर अवैध प्रवासी वाहतूक सर्रासपणे सुरू असून त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून वाहतूक पोलीस प्रशासनाचे आर्थिक हित संबंध जोपासले असल्यामुळे जात नियमबाह्य खाजगी वाहतूक करणाऱ्यांना जणू संरक्षण पुरविले जात आहे. त्यामुळे वणी वाहतूक पोलिस शाखा दिखाव्यापुरती केवळ नाममात्र कारवाही करतात आणि सोडून देतात त्यामुळे पोलीस प्रशासनावरच कारवाई होणे गरजेचे आहे.
शहरातून नागपुर, माजरी ,वरोरा ,राजूर,कायर, मुकुटबन, कुंभारकणी, भालर या मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणारे अनेक ऑटो व ट्रॅव्हल धावत असतात. पोलिस ठाण्यासमोरूनच परिसरातून तसेच तहसील कार्यालयसमोरील हाकेचा अंतरावर ही वाहने मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी करताना दिसून येतात.मात्र याकडे मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी कधीही लक्ष घालत नाही. सर्विस रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्यामुळे सर्व वाहतूक मुख्य रस्त्यानेच सुरू आहे.

त्यामुळे प्रवाशांचाजीव मुठीत आणि अधिकारी वसुलीत अशी परिस्थिती दिसून येत आहे याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. एस टी च्या संपामुळे ग्रामीण व शहरी भागात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कमी प्रमाणात धावत असल्यामुळे त्याचा फायदा खाजगी प्रवासी वाहतूक दारांना होत आहे .
बसची अपुरी संख्या प्रवाशांच्या सोयीनुसार बसची सेवा नसणे ग्रामीण भागात यालाच प्रवासी वैतागून खाजगी वाहतूक करणाऱ्या ऑटो द्वारे प्रवास करीत आहेत . त्यामुळे त्यांनी प्रवासाचे दर वाढविले आहे त्यामुळे सध्या बसचे तिकीट कमी आणि खाजगी वाहतुकीचे तिकीट जास्त असा प्रकार दिसून येत आहे. 
वणी शहरातील मोठे बस स्थानक असले तरीही याच परिसरात खाजगी प्रवासी वाहतुकदारांचा गराडा असतो. दलाल बसस्थानकातून प्रवासी पळवतात सोयीची प्रवाशांच्या दृष्टीने वाटणारी खाजगी प्रवासी वाहतूक धोकादायकही आहे. वणी शहरातील सर्वच ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठला असून प्रवासी जनावर कोंबून वाहतूक केली जाते. याकडे मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देत नाही आणि एखादी मोठी अनुचित घटना घडली तर हेच वरिष्ठ अधिकारी सात्वना देण्यासाठी घटनास्थळाला धाव घेत आहेत याकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होत आहे भेट देत असतात.
* वाहतुकीच्या नियमांची पायमल्ल
.परमीट 6 +1 :- व 3 +1

प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना ६ + १ याप्रमाणे प्रवासी वाहतुकीचा परवाना उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांमार्फत दिला जातो. या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये कमीत कमी २० ते २५ प्रवासी एका वेळी प्रवास करीत असतात त्यामुळे परवान्याच्या तिप्पट प्रवासी वाहतूक करीत असले तरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी याकडे लक्षच देत नाही त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यानी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
2.विना कागद पत्राची वाहने :-
प्रवासी वाहतूक करणारी बरीच वाहने कालबाह्य झाली आहेत. तर अनेक वाहणाचे परमीट चे नूतनीकरण नाही तर दरवर्षी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून गाडीची तपासणी केली पाहिजे असा नियम असला तरीही रस्त्याने प्रवाश्यांची वाहतूक करणाऱ्या बऱ्याच वाहनाचे आरटीओ कडून पासिंग झालेली नाही. तर अनेक वाहने विना विम्याने रस्त्याने धावत आहेत. त्यामुळे वाहनाची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
3.वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली:-
बस स्थानकाच्या २०० मीटर पर्यन्त अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश नाही मात्र या नियमाची वणीत कुठेही अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. सर्विस रोड वर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून शहरातील चौकात अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत याकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होत आहे.





