रात्रीच्या अंधारात वाघाने केला हल्ला, बैलाला केले फस्त
सावली पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या केशरवाही गावातील चंदू तुळशीराम हेटकर यांच्या गोठ्यात नेहमी प्रमाणे बैल बांधलेले होते. रात्री अचानक वाघाने बैलावर हल्ला करुन ठार केले यापूर्वीही चंदू तुळशीराम हेटकर यांच्या गोठ्यात वाघाने हल्ला करुन दुसऱ्या बैलाला ठार केेलं आहेे.
बेल ठार झाल्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. सदर घटनेची चौकशी करण्यासाठी सावली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटना स्थळाला भेट दिली.



