सर्वच विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवास करू द्या – राजूर ग्रामपंचायत व पालकांची मागणी…..
●ग्रामपंचायतने घातले संबंधित अधिकाऱ्यांना साकडे
●निवेदनाची दखल घेत आमदाराने केले सरळ सब एरिया मॅनेजरशी संभाषण अण…त्यातून काढले मार्ग….
वणी (12 एप्रिल):-राजूर गाव हा वेकोलीचा भाग म्हणून खुप प्रसिद्ध आहे. इथे जवळपास 10 हजाराचा वर लोकसंख्या असलेले वस्ती आहे .इथे भांदेवाडा अंडरग्राउंड माईन्स देखील आहे.त्यामुळे इथली वस्ती ही वेकोलीची वस्ती म्हणून परिचित आहे.कुचना शाळेत येणे जाण्यासाठी वेकोलीची बस सुविधा राजूर गावातील वेकोलीबाह्य विद्यार्थ्यांना देण्यासाठी राजूर ग्रामपंचायत व येथील पालकांनी आमदारांना व संबंधित प्रशासनाला मागणी निवेदनातून देण्यात आले.
मोठ्या प्रमाणात वेकोली कर्मचारी यांचे मुले शिक्षणासाठी वणी व कुचना इथे जावे लागते परंतु सामान्य जनतेच्या प्रश्न आता उपस्थित होतो की, कर्मचारी यांचे मुलांनीच शिक्षण घ्यावे काय? त्यासाठी गावातील जागृत पालकवर्ग व ग्रामपंचायतचा पुढाकाराने वेकोलीचा महाप्रबंधकाला व स्थानिक आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना निवेदनातुन थेट साकडे देखील घालण्यात आले की, वेकोलि मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलांना शाळेतजाण्यायेण्या करिता वेकोलिने बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. पण राजूर कॉलरी येथील वेकोलिबाह्य रहिवाशीयांच्या मुलांना शाळेत जाणे येणे करण्याकरिता कोणतीही बस सेवा उपलब्ध नसल्याने त्यांना त्यांना खूप मोठी कसरत करावी लागते .

त्यामुळे बस मध्ये सर्वच विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवास करू देण्याची मागणी केली आहे. निवेदन देतांना सरपंचा विद्या डेव्हिड पेरकावार , बाळूभाउ हिकरे, अॅड. यशवंत बरडे, डेविड पेरकावार, अश्विनी दुबे. प्रियंका डांगरे, बरडे ,नगराळे व पालकवर्ग होते.

प्रतिनिधीनी घेतलेली आमदार संजीवरेड्डीची मुलाखत,
” आम्ही निवेदनावर सरळ राजूर उपक्षेत्रीय प्रबंधकाला कॉल केला असता त्यांनी आम्हाला सांगितले की, साहेब वेकोलीचा बाह्य किंवा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना देखील वेकोलीचा बस मध्ये येण्यास बंधन राहणार नाही असे वेकोली अधिकारी यांनी स्पष्ट आश्वासन दिले. – संजीवरेड्डी बोदकुरवार( वणी विधानसभा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार)




