Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजूर येथे फ्री मेथॉडिस्ट चर्चचा ख्रिस्ती बांधवानी ‘पाम संडे’ (Palm Sunday)केला जल्लोषात साजरा…

●विशेषतःसमाजबांधवानी हातात खजुराची पाने घेऊन भव्य रॅली काढीत जणू काही प्रभू येशूचे जोरदार स्वागतच केले ही लक्षवेधी बाब…….

वणी (10 एप्रिल) :- तालुक्यातील सर्वात मोठ्या गावात फ्री मेथॉडिस्ट राजूर चर्चचा समाजबांधवानंतर्फे ख्रिस्त बांधवांनी दिनांक 10 एप्रिल 2022 ला सकाळी 8 वाजता हातात खजुराची पाने घेऊन भव्य रॅलीत काढत “पाम संडे” जल्लोषात साजरी करण्यात आली.

येशू ख्रिस्त  (Jesus Christ) यांना मानवतेचा अवतार मानला जातो, ज्यांनी मानवाच्या कल्याणासाठी हसता हसत सुळावर जाणे पसंत केले. काही ठिकाणी असेही म्हटले जाते की- ‘Jesus died for our sins’. तर गुड फ्रायडे (Good Friday) च्या दिवशी येशूला वधस्तंभावर चढवण्यात आले, त्याच्या आदल्या रविवारी येशूचे जेरुसलेम (Jerusalem) नगरीत आगमन झाले होते. येशूचा नगरीत झालेला प्रवेश हा तिथल्या नागरिकांनी खजुराची पाने दाखवून साजरा केला होता. त्या दिवसाची आठवण म्हणून आजही जगभरातील ख्रिस्ती बांधव हा दिवस ‘पाम रविवार’ किंवा ‘पाम संडे’ (Palm Sunday) म्हणून साजरा करतात. यंदा हा दिवस रविवार, 5 एप्रिल रोजी साजरा केला जाईल.पाम संडेला पवित्र आठवड्याची (Holy Week) सुरुवातही मानली, ज्याचा शेवट इस्टर (Easter) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाविषयी म्हटले जाते की, जेव्हा प्रभु येशू जेरूसलेमला पोहचले, तेव्हा मोठ्या संख्येने लोक त्याचे स्वागत करण्यासाठी हातात खजुराची पाने घेऊन उभे होते. तिथल्या जनतेने प्रभु येशूची शिकवण व चमत्कारांचे जोरदार स्वागत केले. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.म्हणून यादिवशी राजूर फ्री मथोडीस्ट राजूर चर्चे मध्ये विशेषतःप्रार्थनेचे आयोजन केले. तसेच समाजबांधव खजूर हातात घेत ख्रिस्त बांधव संपूर्ण गावात मोठी रॅली काढण्यात आली .खजुराच्या पानांना या दिवशी खास महत्व असते, या पानांचा क्रॉस बनवन्यात आले.या प्रकारचे खास क्रॉस घरात किंवा गाडीत ठेवले जाते. खजुराचे झाड हे विजय आणि चांगुलपणा यांचे प्रतिक मानले जायचे व त्यामुळे आजही या झाडाचे विशेष महत्व आहे.

यावेळी रॅलीतचे आयोजन फ्री मेथॉडिस्ट चर्च कोर कमिटीचे अध्यक्ष पास्टर गिरीश शिरमनवार, सचिव डेविड पेरकावार ,खजिनदार प्रकाश तालावार ,अब्राहम कलवलवार , शाम संगमवार,पेतरस पारखी ,बाबू कुक्कलवार ,विनोद तान्द्रा,समस्त युवकवर्ग, पुरुषवर्ग,महिलावर्ग व समाजबांधव होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!