अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या फरार आरोपीस अखेर अमरावती वरून अटक
●दीड वर्षा पासून होता फरार
मारेगाव( 8 एप्रिल ) :- गेल्या दीड वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेणाऱ्या फरार आरोपीला अमरावतीतील वडारपुरा येथून मोठ्या शिताफीने अटक करण्यास अखेर मारेगाव पोलिसांना यश आले.संतोष चौगुले (24) रा.मारेगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मारेगाव शहरातील एका अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीचा पोलिस तपास करत असताना आरोपी संतोष चौगुले (वय 24) रा. मारेगाव हा पोलीसांना चकमा देण्यास यशस्वी होत होता. परंतु पोलिसांना अचानक मिळालेल्या गुप्त माहिती व मोबाईल लोकेशन च्या आधारे मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पथक नेमून ए.एस.आय ताजणे, प्रमोद जिडेवार, अजय वाभीडकर, रजनीकांत पाटील, यांचे पथक तयार करून अमरावती येथे पाठवण्यात आले.
दरम्यान अनेक प्रकारच्या कसरतिचा सामना पोलिसांना करावा लागला अखेर मोबाईल लोकेशन च्या आधारे अमरावती वडारपुरा येथे दीड वर्षापासून भाड्याचे रूम करुन राहत असणाऱ्या ठिकाणावरून अमरावती पोलीस व मारेगाव पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यास अखेर यश प्राप्त झाले आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 322,20, विविध विविध कलमानुसार गुन्हे दाखल करुन आरोपी ला अटक केली असून पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.



