नळाला अपूर्ण पाणीपुरवठा होत असल्याने ठाणेगाव येथील नागरिकांनी दिले निवेदन,
नळाला अपूर्ण पाणीपुरवठा होत असल्याने ठाणेगाव येथील नागरिकांनी दिले निवेदन,
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी / आरमोरी :– तालुक्यातील ठाणेगाव येथे काही दिवसांपासून नळाला अपूर्ण पाणी पुरवठा होत असल्याने गावतील नागरिक व महिला त्रस्त झाले असून गाढवी नदीला भरपूर पाणी असून देखील भर उन्हाळ्यात नळाला अपूर्ण पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे ठाणेगाव येथील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावी अशी मागणी केली आहे . ठाणेगाव येथील काही नागरिकांनी नळाला टिल्लू पंप लावले असल्यामुळे इतर नळ धारकांना अपूर्ण पाणी पुरवठा होत असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाच्या लक्षात आणून देवून व अशा लोकांवर कारवाई करून नळ योजना सुरळीत करावी अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनास दिलेल्या निवेदनातून नागरिकांनी केली आहे .



