Vidarbh24News

Latest Online Breaking News

कोरोना बाधीताची संख्या 27 -चंद्रपूर

चंद्रपूर जिल्हातील बाधीताची संख्या पोहचली 27 वर

Ø  शुक्रवारी वाढला एक कोरोना बाधीत

Ø  अॅक्टिव्ह बाधितांची संख्या 5

Ø  जिल्ह्यात 11 कंटेनमेंट झोन कार्यरत

Ø  68 हजारांवर नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण

Ø  एक हजारांवर नागरिक संस्थात्मक अलगीकरणात

चंद्रपूर, दि. 5 जून: चंद्रपूर महानगरातील भिवापुर वॉर्ड परिसरातील एक 62 वर्षीय व्यक्ती शुक्रवार दिनांक 5 जून रोजी कोरोना बाधित आढळला. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार काल चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात सारीचे रुग्ण म्हणून अती दक्षता कक्षात दाखल बाधीताच्या स्वॅबचा अहवाल आज 5 जून रोजी पॉझिटीव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बांधीतांची संख्या 27 झाली आहे. यापैकी, जिल्ह्यात 22 कोरोना बाधित बरे होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या दोन कोरोना बाधित कोविड केअर सेंटर वन अकादमी चंद्रपूर येथे व तीन कोरोना बाधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण अॅक्टिव्ह बाधितांची संख्या 5 असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

जिल्ह्यात एकूण 16 कंटेनमेंट झोन कार्यान्वित होते. यापैकी कृष्णनगर चंद्रपुर, बिनबा गेट चंद्रपुर, दुर्गापुर वार्ड क्रमांक 3 चंद्रपूर, जाम तुकुम पोंभुर्णा, लक्कड कोट राजुरा या 5 कंटेनमेंट झोनचे 14 दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे सदर झोन बंद करण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यात 11 कंटेनमेंट झोन कार्यरत आहेत.

एकूण 16 कंटेनमेंट झोन मधील आयएलआय रुग्णांचे आजपर्यंत 42 नमुने घेण्यात आले होते. यापैकी सर्वच 42 नमुने निगेटिव्ह आलेले आहे.

कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. आयएलआय व सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे. तसेच आयएलआय व सारी रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात येत आहेत.

कोविड-19 संक्रमित 27 रुग्णांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -1, हरियाणा (गुडगाव)-1,हैद्राबाद-1, मुंबई-5, ठाणे -2, पुणे-6, यवतमाळ -2, नाशिक -3, कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचे सहवासीत -6 आहे.

जिल्ह्यामध्ये 1 हजार 358 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 27 नमुने पॉझिटिव्ह, 1 हजार 155 नमुने निगेटिव्ह तर 176 नमुने प्रतीक्षेत आहेत.

दिनांक 5 जून रोजी एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 539 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 841 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत.तालुकास्तरावर 404 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर, जिल्हास्तरावर 294 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात 74 हजार 755 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 68 हजार 530 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले असून 6 हजार 225 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधीत ), 13 मे ( एक बाधीत), 20 मे ( एकूण 10 बाधीत ), 23 मे ( एकूण 7 बाधीत),24 मे ( एकूण बाधीत 2 ), 25 मे ( एक बाधीत ), 31 मे ( एक बाधीत ) 2 जून (एक बाधीत), 4 जून ( दोन बाधीत), 5 जून ( एक बाधीत)अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधीत 27 झाले आहेत.आतापर्यत 22 बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 27 पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता 5 आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!