तालुका आरोग्य अधिकारीपदी डॉ. मनोहर मडावी यांची निवड
तालुका आरोग्य अधिकारीपदी डॉ. मनोहर मडावी यांची निवड
बऱ्याच दिवसापासून सावली तालुका आरोग्य अधिकारीपद रिक्त होते. यापदावर अतिरिक्त प्रभार डॉ. मामीडवार यांचेकडे होते परंतु कोरोना प्रभावामुळे ते तालुक्याला येत नव्हते तसेच त्यांच्याकडे प्राथमिक आयोग्य केंद्र नवेगाव मोरे येथील सुद्धा प्रभार सोपविण्यात आला होता. त्यामुळे त्यांना तालुका आरोग्य अधिकारी सावली या पदाचे कार्य करण्यास फार अडचणीचे होते. यास्तव तालुका सावली येथील कामे व्यवस्थित पार पाडण्यास्तव व सध्या कोरोनाची साथ लक्षात घेता तालुका आरोग्य अधिकारी सावली या पदाचा प्रशासकीय व वित्तीय प्रभार डॉ. मनोहर मडावी यांचेकडे सोपविण्यात आला.



