आत्तापर्यंत ३० लाख मजूर स्पेशल ट्रेन्सनी आपापल्या घरी पोचवले : पीयूष गोयल
देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउनच्या कालावधीत सर्व उद्योगधंदे बंद आहेत. त्यातच सरकारनं रेल्वे सेवादेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता हळहळू रेल्वे सेवा पूर्वपदावर येताना दिसत आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी २०० विशेष नॉन एसी रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्या ट्रेनच्या तिकिटांचं आरक्षणही सुरू करण्यात आलं होतं. आता त्या पाठोपाठ आता कॉमन सर्व्हिस सेंटरवरही तिकीट विक्री सुरू करणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली. तसंच आतापर्यंत ३० लाख मजुरांना श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं असल्याची माहिती त्यांनी दिली.
कॉमन सर्व्हिस सेंटरवर तिकिट विक्रीसह आता काही ठराविक रेल्वे स्थानकांवरदेखील जाऊन रेल्वेच्या तिकिटांचं आरक्षण करता येणार आहे. सध्या देशातील १.७ लाख कॉमन सर्व्हिस सेंटरवर तिकिट विक्री सुरू करण्यात येणार आहे. तसंच पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये प्रवाशांना ठराविक रेल्वे स्थानकांवरील तिकिट विक्री सुरू केली जाणार असून त्यासंदर्भात प्रोटोकॉल तयार केला जात असल्याचं गोयल म्हणाले.
We are going to announce the resumption of more trains in the upcoming days. We have also permitted the operation of shops at railway stations. However, only takeaways will be allowed: Railway Minister Piyush Goyal https://twitter.com/ANI/status/1263366498002726913 …
ANI✔@ANI
Booking of train tickets will resume at around 1.7 lakh common service centres from tomorrow across the country. Bookings will also resume at counters of different stations in the next 2-3 days. We are developing a protocol in this regard: Railway Minister Piyush Goyal
३० लाखांपेक्षा अधिक कामगार गावी
यावेळी रेल्वेमंत्र्यांनी श्रमिक ट्रेनबाबतही माहिती दिली. आतापर्यंत २०५० पेक्षा अधिक श्रमिक ट्रेनद्वारे ३० लाखांपेक्षा अधिक प्रवासी मजूर त्यांच्या गावी परतले असल्याचं ते म्हणाले. “आमच्यासाठी हे खुप कठीण मिशन होतं. परंतु आम्ही त्यात यशस्वी झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे या मिशनवर लक्ष ठेवून आहेत,” असंही त्यांनी सांगितलं. “श्रमिक ट्रेन चालवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं सर्वात जास्त स्वारस्य दाखवलं. बिहारनंदेखील उत्तम काम केलं. ओदिशा आणि पश्चिम बंगालनं श्रमिक ट्रेनची मागणी केली होती. परंतु अम्फान या वादळामुळे त्या ठिकाणची रेल्वेसेवा तात्पुरती स्थगित केली आहे. २३ मे नंतर या ठिकाणी पुन्हा रेल्वे सेवा सुरू करण्यात येईल. काही राज्ये आताही आम्हाला सहकार्य करत नाहीयेत. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत केवळ ट्रेनच्या २७ फेऱ्या झाल्या,” असंही गोयल यांनी स्पष्ट केलं.




