अबब !!!! धाड़ पडताच बार मालक शेतातून पळाला
-1 लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त
-1 आरोपी अटकेत, 2 फरार
वणी (20 एप्रिल ):-सोमवारी दुपारी 4 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने वरोरा मार्गावरील व्ही. व्ही. बार ॲन्ड रेस्टॉरंट वर धाडसत्र अवलंबले. पोलिसांची चाहूल लागताच बार मालक सैरावैरा शेतातून पळाला. यावेळी 1 लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त करून एकाला अटक करण्यात आली तर दोघे फरार झाले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायद्या नुसार विविध नियमावली शासनाने जाहीर केली आहे. तर टाळेबंदी सोबतच संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे आस्थापना, दुकाने यावर निर्बंध लावण्यात आले आहे.
त्या सोबतच देशी, विदेशी दारू दुकाने पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने निर्गमित केले असून उत्पादन शुल्क विभागाने दारू दुकाने सील केली आहेत.
तरी सुध्दा अनुध्यप्ती धारक आर्थिक लाभाकरिता सील झालेल्या दारू दुकानातील चोरट्या प्रवेशद्वाराचा वापर करून अवैद्य दारू विक्री करीत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.
अविनाश सुधाकर सोनावने वय 26 रा. वणी यास घटनास्थळावरून अटक करण्यात आली तर बार मालक, प्रविण सरोदे व बादशाह यांनी धूम ठोकली तर वाहन कंमाक एमएच-34-के- 4501 च्या मालका विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरोरा मार्गावरील सावरला गावाच्या हद्दीत व्ही. व्ही. बार ॲन्ड रेस्टॉरंट आहे. सदर बार मधून अवैधरित्या दारू काढत असल्याची गोपनीय माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांना मिळाली.
त्यांनी पथकासह घटनास्थळी धडक दिली, यावेळी बार समोर उभी असलेल्या वाहनाची तपासणी केली असता बि 7 कंपनीचे 750 मिली क्षमतेचे 23 नग, ब्लेंडर प्राईड कंपनीचे 2 लिटरचे 6 नग किंमत 35 हजार 740 रुपये व 1 लाख 50 हजाचे वाहन असा एकूण 1 लाख 85 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमासह कलम 269,188 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ दिलीप पाटील – भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात शिरपूर चे ठाणेदार सचीन लुले,
विजय वानखडे, प्रदीप ठाकरे, ईक्बाल शेख, रवि इसनकर, परेश मानकर, संतोष कालवेलवार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक सुर्वे, सतीष घाडगे यांनी केली.



