राजुर येथील सुप्रसिद्ध जिजाई कंप्यूटरचे संचालक जयंत कोयरे यांचे वडील लक्ष्मण दुगाजी कोयरे अल्पशाआजाराने दुःखद निधन
🙏 *निधन वार्ता* 🙏
वणी (18 एप्रिल ):- तालुक्यातील राजुर गावातील जिजाई कंप्यूटरचे संचालक जयंत कोयरे यांचे वडील लक्ष्मण दुगाजी कोयरे वय (70 वर्षे) यांचे काल दिनांक 17.4.2021 रात्री 11.54. वाजताच्या दरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
दुःखद निधनाने गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे .प्रत्येक व्यक्ति आज सुन्न अवस्थेत आहे .
एक वेगळी व्यक्तिमत्व व मित्रांना आपल्या हासत्या भाषेत मंत्रमुग्द करणारा तसेच गावातील एक उत्तम स्वभावाचा व्यक्ति निघुन गेल्यामुळे त्यांचा परिवारात व गावात शोकांतिचे वातावरण पसरलेले आहे.

त्यांचे पार्थिव शरीर त्यांचा राहत्या घरी राजुर येथे ठेवण्यात आले आहे. राजुर येथील मोक्षधामात अंत्यविधि आज दिनांक 18.4.2021 ला रविवारी सुमारे 11.00 वाजता च्या दरम्यान करण्यात येईल.
लक्ष्मण दुगाजी कोयरे यांचे आज निधन वार्ता गावात पसरली आहे.
त्याच्या मागे पत्नी, दोन मुले व एक नातवंड असा आप्त परिवार आहे.



